कोलकाता : पश्चिम बंगालमधील सर्व 292 जागांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. तृणमूल काँग्रेसने 194 जागांवर आघाडी घेतली असून भाजपा मात्र 100 च्या आतच रोखली जाण्याची शक्यता आहे. भाजपा 93 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये पुन्हा सत्ता काबीज करणार असल्याचं दिसत आहे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक, भाजपच्या मंगला अंगडी आघाडीवर #belgaum #Byelection #बेळगाव #पोटनिवडणूक #भाजपा #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/vG8nUlR6CB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच या इर्षेने भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा या निवडणुकीत उतरवली होती. तर अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या ममता बॅनर्जी यादेखील चवताळून भाजपशी दोन हात करण्यासाठी ठामपणे उभ्या ठाकल्या होत्या. विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी 148 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे कोणता पक्ष बहुमताच्या या आकड्यापर्यंत पोहोचणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 8 हजाराने पिछाडीवर आहे. हा त्यांच्याकरिता मोठा धक्का आहे.
* आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी
– नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर- नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे शुभेंदू अधिकारी उभे आहेत.
– बंगालमध्ये तृणमूल आघाडीवर सध्या 150 जागांवर TMC तर 83 जागांवर भाजप आघाडीवर आहे.
– आसाममध्ये भाजपची मुसंडी- आसाममध्ये सध्या भाजप 70 जागांवर तर काँग्रेस 39 जागांवर आघाडी आहे.
भाजपाचे समाधान आवताडे सात ते बारा फे-यांमध्ये आघाडीवर, पंढरपूर शहरात मुसंडी https://t.co/usjxJaOLi5
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021