कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत 21 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज पेट्यांमध्ये बंद होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यात गोकुळचे कार्यक्षेत्र आहे. 70 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
गोकुळसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत 21 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत.या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज पेट्यांमध्ये बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी 3650 पात्र सभासद होते मात्र दुर्दैवाने यातील तिघांचा मृत्यू झाल्याने आज 3647 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक असा सामना या निवडणुकीनिमित्ताने होत आहे. आज (2 मे ) मतदान होत असून मंगळवारी (4 मे ) मतमोजणी होणार आहे.
सोलापूरच्या सध्या ज्वलंत उजनी पाणी पळवण्याच्या विषयावरुन राजकारण चांगलेच तापलंय, यावर समाज माध्यमावर खूप काही व्हायरल होत आहे. असेच एक व्हायरल कार्टून #surajyadigital #उजनी #viralpost #kartun #solapur #political #राजकारण #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/b8E8zX4JX0
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
या निवडणुकीत सत्ताधारी आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने आव्हान दिलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यात गोकुळचे कार्यक्षेत्र आहे. या निवडणुकीत 3656 एकूण मतदार असून त्यापैकी 3 जण मयत आहेत. 70 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी 385 शासकीय कर्मचारी मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. कोरोना बाधित मतदारांना पीपीई किट घालून मतदान करता येणार आहे.
* आघाडीत अवघ्या चार दिवसात फूट
गोकुळ बचाव समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून सत्ताधारी महाडिक गटाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील या निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केलीय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना एकत्र आणत सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा केली. मात्र अवघ्या चार दिवसात त्यात फूट पडली. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आघाडीची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला. गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहणार असल्याचं सरुडकरांनी स्पष्ट केलं.
कोविशिल्डचे उत्पादक पूनावालांना धमकी, मागणीची पूर्तता करताना प्रचंड तणाव, वर्षभरात इंग्लंडसह 68 देशांना लसीचा पुरवठाhttps://t.co/gryfzk4Ief
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021
* गोकुळ दूध संघाविषयी थोडक्यात
– दूध संघाचा जिल्ह्यात आणि राज्यात लौकिक
– रोज 30 ते 35 लाख लिटर दुधाचं संकलन
– मुंबई पुण्यासह अनेक मोठ्या शहरात गोकुळ दुधाला मागणी
– गोकुळची रोजची कोट्यवधीची उलाढाल
– गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघात
कोरोना रुग्ण बरा व्हावा म्हणून अंडी आणि चिकनची दुकाने दिवसभर चालू ठेवण्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी #अंडी #चिकन #eggs #surajyadigital #अजितपवार #Demand #सुराज्यडिजिटल #मागणी #covid #patient #कोविड #रुग्ण pic.twitter.com/yYFEqpeZxU
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 1, 2021