सातारा / बीड : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. राज्यात रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात वीज कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जनावरे दगावली. तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. कवठे (सातारा) येथे वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर बीड जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज पडून दोन महिला ठार झाल्या. परभणीत वीज पडून तिघांचा मृत्यू झाला.
तुमच्या जवळचे कोरोना लसीकरण केंद्र कोणते ? या whatsapp नंबरवर विचारा #coronavirus #Whatsapp_Number #vaccine #WhatsAppNo #विचारा #CoronaVaccine pic.twitter.com/oEaYoWKOXs
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
राज्यात काल रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात वीज कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जणावरे दगावली. वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा, केळीच्या बागा, द्राक्षबागा उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कवठे (सातारा) येथे रविवारी दुपारी शेतातील झोपडीवर वीज कोसळून शशिकांत लिमन व खाशाबा जाधव या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
बीड जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज पडून दोन महिला जागीच ठार झाल्या. यात एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेतामध्ये शेळी-मेंढी घेऊन चारण्यासाठी गेलेले वसाडी बुद्रुक येथील अनंत श्रीकृष्ण बोडके (३२) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.
अभिनेते कमल हासन यांचा १७०० मतांनी पराभव https://t.co/uAyAGhX6Of
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
परभणीत वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील भोर येथे सीमा अरुण हिलम (११) व अनिता सिंकदर मोरे (९, दोघी रा. चेलाडी) यांचा मृत्यू झाला. तर परभणीत २ अल्पवयीन मुलांसह ५५ वर्षीय गंगाधर रामभाऊ होरगुळे यांचा वीज पडून मृत्यू झाला. जळगावात एकाचा मृत्यू झाला.
ममतांना हरवणा-या शुभेंदू अधिकारी यांच्या कारवर हल्ला #bengal #BangalElection2021 #surajyadigital #बंगाल #सुराज्यडिजिटल #ममताबनर्जी #MamataBanerjee #हल्ला pic.twitter.com/O1lXOLWCl8
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हजेरी लावली. तळेगाव येथे वीज पडून महिला जागीच ठार झाली आहे. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी घडली. हिंमत मोरे यांच्या शेतात शेत मशागतीचे काम सुरू होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळी वारा सुरू झाला. पाऊस सुरू झाला. त्याचवेळी झाडाच्या आडोशाला उभ्या असलेल्या वंदना हिंमत मोरे यांच्या अंगावर वीज कोसळून त्या जागीच ठार झाल्या.
… हा तर रडीचा डाव, ममतांच्या पराभवानंतर शरद पवार बरसले https://t.co/KJrwo9K3P4
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
* वादळी वाऱ्याने मोठे आर्थिक नुकसान
सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्याने विजेची तार पत्र्यावर पडल्याने शेडमधील शेळी ठार झाली. येथील केळीच्या बागा, द्राक्षबागा उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कोल्हापूरमध्ये रविवारी चारनंतर आलेल्या वादळी पावसाच्या हलक्या सरींनी गारव्याची फुंकर घातली. बीड जिल्ह्यात चंदन सावरगाव येथे शेतातील घरावर वीज पडल्याने सोयाबीन, हरभरा, गहू धान्य, पाइप, मोटारसायकलसह कडबा गंजी जळून खाक झाली. लातूर जिल्ह्यात वीज पडून बैलजोडी, म्हैस ठार झाली. हिंगाेली जिल्ह्यात सायंकाळी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नंदुरबारसह परिसरात पावसाचा शिडकावा झाला. गडचिराेलीत गारपिटीमुळे धान पिकाचे नुकसान झाले.
डहाणू- काँग्रेसचे माजी खासदार दामोदर बारकू शिंगडा यांचे निधन https://t.co/TF1PU7IupB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021