सोलापूर / पंढरपूर : काल झालेल्या मतमोजणीत निसटत्या मताने पराभव झाला असला तरी आज सकाळपासून पुन्हा कामाला सुरुवात केली असून जनतेने यावेळी वडिलांपेक्षा जास्त 15 हजार मतांचा आशीर्वाद दिल्याने पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन, असा विश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला.
सोनिया गांधी, पवारांसह विरोधी पक्षांच्या १३ नेत्यांची मागणी; केंद्राने मोफत लसीकरण सुरु करावे, तरतूद करण्यात आलेला ३५ हजार कोटींचा निधी वापरावाhttps://t.co/nrjyC1e4R6
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
सर्व शक्ती एकत्र येऊन आपल्या विरोधात लढल्या असल्या तरी मतदारसंघातील जनतेने गेल्यावेळी पेक्षा 15 हजार मतांची वाढ झाली आहे. आपले वडील देखील 2004 साली पहिल्यांदा पराभूत झाले होते, मात्र लगेच दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा जनतेत मिसळून काम केले आणि नंतर 3 वेळा विजयी झाले होते. तीच लढायची शिकवण वडिलांनी दिली असून पुढच्या वेळी या पराभवाचे उट्टे काढेन, असे भगीरथ भालके यांनी सांगितले.
ब्रेकिंग – आयपीएलमध्ये कोरोना, आजचा सामना रद्द https://t.co/5x8T88iFmZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
* पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन
विजयी झाल्यावर वडिलांप्रमाणे शड्डू ठोकण्याचा प्रयत्न विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बाजूला राहून शड्डू ठोकण्यापेक्षा 2024 च्या निवडणुकीत समोर या मग शड्डू कोण ठोकतोय ते दाखवून देईन असा टोला भगीरथ यांनी लगावला. आजही भारत भालके यांच्याच प्रमाणे कार्यकर्त्यांची गर्दी भगीरथ यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात दिसत असून पराभूत झाले तरी आम्ही तुमच्या सोबत असल्याचे कार्यकर्ते दाखवून देत आहेत, असं ते म्हणाले.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; वीज पडून ११ जणांचा मृत्यू https://t.co/WwL3YwkN4a
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
* आनंद साजरा करायचा आणि जल्लोष करायची वेळ नाही
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालातून मंगळवेढ्यातील भूमिपुत्राला आमदार होण्याची संधी तब्बल चाळीस वर्षांनंतर प्राप्त झाली आहे. तसेच या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विरोधातील वातावरणाचा लाभ घेण्यात भाजपाचे नेते यशस्वी ठरत आहे. त्यामुळे राज्यातील भाजप आमदाराच्या संख्येत एका आमदाराची भर पडली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आमदार झालेले समाधान अवताडे यांनी आज सोमवार, सकाळपासून थेट कामाला सुरुवात केली आहे. आज मंगळवेढा आणि नंतर पंढरपूर येथे अधिकाऱ्यांच्या बैठक घेत कोरोना उपाययोजनांबाबत त्यांना सूचना दिल्या. काल जरी आमदार झालो असलो तरी आनंद साजरा करायचा आणि जल्लोष करायची वेळ नसून कोरोनाचे संकट वाढत चालल्याने पहिल्यांदा त्याच्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आज सकाळीपासून कामाला सुरुवात केल्याचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. सध्या पंढरपूर आणि मंगळवेढ्यात नागरिकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यात मोठ्या अडचणी येत असून कोविड केअर सेंटर देखील फुल झाल्याने नवीन जागांची व्यवस्था उभी करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. सध्या पंढरपूरमध्ये ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा जाणवत असून तीच अवस्था रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत होत असल्याने जादाचा साठा मिळवण्याबाबत प्रयत्न सुरु केल्याचे अवताडे यांनी सांगितले.
तुमच्या जवळचे कोरोना लसीकरण केंद्र कोणते ? या whatsapp नंबरवर विचारा #coronavirus #Whatsapp_Number #vaccine #WhatsAppNo #विचारा #CoronaVaccine pic.twitter.com/oEaYoWKOXs
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव , तहसिलदार सुशील बेल्हेकर , पंढरपूरचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. तसेच या उपायोजाबाबत लवकरच जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्याकडून काही मागण्या करणार असल्यांचेहि त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
“माझ्याजवळ केवळ साडेतीन वर्षाचा कालावधी असल्याने पहिल्यांदा कोरोना संकट आणि नंतर पाणी प्रश्नासह इतर अडचणी सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कमी वेळ व जादा आव्हाने आहेत, वेळेचे नियोजन करत वेगाने कामे पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असून जनतेचा विश्वास पूर्ण करण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडणार आहे”
समाधान आवताडे – आमदार