मुंबई : देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. देशातील ही भीषण स्थिती पाहून अभिनेता शक्ती कपूर हेही हवालदिल झाले आहेत. हा काळ अतिशय कठीण काळ आहे. सोशल मीडिया उघडायला, न्यूज बघायलाही मला भीती वाटतेय. मृत्यू आता आणखी जवळ आला आहे. आधी मरणार आहे, मरणार आहे असे लोक म्हणायचे आणि दहा वर्षे निघून जायची, पण आता लोक किड्यामुंग्यांसारखे मरत आहेत. सगळे अकल्पित आहे. परिस्थिती हाताबाहेर जातेय, असं त्यांनी म्हटलं आहे.
आधारकार्ड नसलेल्यांचं लसीकरण होणार का?, मुंबईच्या महापौर म्हणाल्या… https://t.co/dYukVQzF8T
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत तर वाढ होतचं आहे, पण दुसरीकडे प्रत्येक दिवशी कोरोनामुळे हजारो रूग्णांचा जीव जात आहे. एका अदृश्य व्हायरसने जगात हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा खलनायक क्राईम मास्टर गोगो म्हणजेच अभिनेते शक्ती कपूर यांनी देखील भीती व्यक्त केली आहे. ‘आता मृत्यू जवळ आला आहे…’ असं म्हणत त्यांनी स्वतः ची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मीडिया रिपोर्टनुसार झालेल्या एका मुलाखतीत शक्ती कपूर म्हणाले, ‘वर्ष फार कठीण आहे. आता मृत्यूदेखील जवळ आला आहे. पूर्वी लोकं म्हणायची मी आता मरणार पण पुढचे 10 वर्ष जगायची. पण आता मृत्यू काय आहे? आज लोकं माश्यांसारखे मरत आहेत.’ असं म्हणत त्यांनी परिस्थिती फार भयावह असल्याची जाणीव करून दिली आहे.
याठिकाणी शक्ती कपूर यांनी त्यांच्या मित्राचं एक उदाहरण दिलं, ‘माझ्या मित्राच्या भावाला सकाळी रूग्णालयात दाखल केलं आणि सायंकाळी त्याच्या निधनाची बातमी कानावर आली. तुम्ही अंदाजा नाही लावू शकतं. परिस्थिती हाताबाहेर जात आहे. लसीकरण लवकरात लवकर करून घ्या.’ असं देखील शक्ती कपूर यांनी यावेळेस सांगितलं.
आयपीएल सुरू ठेवण्याचा आग्रह का ? जाणून घ्या, आर्थिक गणित, शेवटी केली रद्दhttps://t.co/sBZb2f0IVm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
दरम्यान, शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरने प्लाझ्मा दान केलं. त्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि खुद्द शक्ती कपूर यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत माहिती दिली. शिवाय अन्य लोकांना देखील प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं आहे. ज्यामुळे कोरोना महामारीवर आपण विजय मिळवू शकू.
बिग ब्रेकिंग : अखेर आयपीएल रद्द https://t.co/whKNRVVq8W
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021