कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळ आहे. मात्र जे कुणी पंतप्रधानपदावर होते, त्यांनी आतापर्यंत आपल्याला फोन करुन शुभेच्छा दिल्या होत्या, पण पहिल्यांदाच यावेळी मला शुभेच्छांचा फोन आला नाही, असे ममतादीदींनी म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
१०० दिवसांची कोविड ड्युटी करणाऱ्यास सरकारी नोकरीत प्राधान्य https://t.co/P1S6L7c93b
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगले आहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 212 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. तृणमूलच्या या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, ममतांच्या बंगालमधील विजयानंतर त्यांनी फोन करुन शुभेच्छा न देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे निधन
https://t.co/yKlLb5ScnV— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 215, भाजप 77 असे चित्र आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्ता स्थापन करीत आहेत. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
Congratulations to Mamata Didi for @AITCofficial's win in West Bengal. The Centre will continue to extend all possible support to the West Bengal Government to fulfil people’s aspirations and also to overcome the COVID-19 pandemic. @MamataOfficial
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2021
तृणमूलच्या या विजयावर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल अभिनंदन ममतादीदी. केंद्र सरकार पश्चिम बंगालमधील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि कोरोना महामारीवर मात करण्यासाठी राज्य सरकारला मदत करेल. परंतु, या वेळी मोदींनी ममतांना विजयाबद्दल फोन केला नाही. दरवेळी पश्चिम बंगालमधील विजयानंतर मोदी हे ममतांना आवर्जून फोन करुन शुभेच्छा देत असत. या वेळी मात्र, मोदींनी ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी थेट ममतांना फोन करुन शुभेच्छा देणे टाळले आहे. खुद्द ममतांनीच याची माहिती दिली आहे.
मोठा उल्कापींड पृथ्वीवर आदळण्याची शक्यता; नासाचा इशारा #surajyadigital #नासा #NASA #Earth #उल्कापींड #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/cy3cmV46At
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
भाजप प्रचंड ताकदीने या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. परंतु, निकाल पाहता राज्यातील जनतेने भाजपला नाकारल्याचे दिसत आहे.
– काय वाटतं ?
पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचा विजयाचा आमदार पडळकर देवेंद्र फडणवीसांना पेढा भरवताना…#surajyadigital #politics #pandharpur #ByElection #DevendraFadnavis #Gopichand #MLA #भाजपा #विजय pic.twitter.com/U6KRDr6yWh— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021