कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे अख्ख्या कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघालं होतं. आता गोकुळ दूधसंघावर जवळपास तीन दशकांनंतर सतेज पाटलांच्या पॅनेलनं विजय मिळवलाय. पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक आणि पाटील पॅनेलचा धुव्वा उडवून दिला आहे. महाडिक आणि पाटील गटाची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता संपुष्टात आणली आहे.
बिग ब्रेकिंग : अखेर आयपीएल रद्द https://t.co/whKNRVVq8W
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या पॅनेलला पराभव पत्करावा लागलाय. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. अखेर या निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या पॅनेलनं विजय मिळवत दबदबा निर्माण केलाय.
आयपीएल सुरू ठेवण्याचा आग्रह का ? जाणून घ्या, आर्थिक गणित, शेवटी केली रद्दhttps://t.co/sBZb2f0IVm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
तीन दशकांनंतर कोल्हापुरात दूध संघात परिवर्तन झालंय. या निवडणुकीत राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीनं बाजी मारली असून, गोकुळमध्ये अखेर सत्तांतर झालंय. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत 21 पैकी सतेज पाटील यांच्या आघाडीला 17 जागांवर विजय मिळालाय. सत्ताधारी महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलंय. या निमित्तानं आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता संपुष्टात आलीय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गोकुळ दूधसंघातील 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीसाठी 3650 पात्र सभासद होते, मात्र दुर्दैवाने यातील तिघांचा मृत्यू झाला. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू होती. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता निवडणुकीचा स्पष्ट कौल हाती आलाय. सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने आव्हान देत विजय संपादन केलाय.
गोकुळ निवडणूक : सतेज पाटील यांच्या गटातील चार उमेदवार विजयी #kholapur #कोल्हापूर #गोकुळ #satejpatil #surajyadigital #सुराज्यडिजिटल #Gokul pic.twitter.com/hieOHD7yJa
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
* शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ
या विजयानंतर काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोठी घोषणा केलीय. सतेज ऊर्फ बंटी पाटलांनी शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ देऊन टाकलीय. पालकमंत्री सतेज पाटील यांनी विजयानंतर पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केलीय. दूध उत्पादकांच्या मालकीचा हा दूध संघ आता झालाय. दूध उत्पादकांनी चांगलं यश मिळवून दिलंय. मनापासून डोकं ठेवून दूध उत्पादकांचे आभार मानतो.
हा दूध संघ मल्टिस्टेटच्या माध्यमातून कोणाच्या घशात जाऊ नये, ही आमची भावना आहे. निवडणूक आता संपलीये, काल कोणी काय केलं, यावरून आम्ही निवडून आलोय. आता नवा अजेंडा असणार आहे, असंही सतेज पाटलांनी स्पष्ट केलंय. मतदार हा आपला बाप आहे. निवडणुकीत शब्द अपशब्द वापरले गेले होते, ते व्हायला नको होतं, असंही जाता जाता बंटी पाटील म्हणालेत.