मुंबई : मुंबईत कोरोना लसीकरण राबवलं जात आहे. मुंबईत परप्रांतीयांची संख्या अधिक आहे. अशावेळी त्यांच्याकडे आधारकार्ड नसण्याची शक्यता आहे. अशांचे लसीकरण कसं होणार हा मोठा प्रश्न आहे. खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केला आहे. तसेच, मुंबईत अनेक जैन मुनी आहेत. त्यांच्याकडेही आधार कार्ड नाही, याचा विचार महापालिका करत असल्याचं महापौर किशोरी पेडणेकरांनी सांगितलं आहे.
अभिनेत्री दीपिकाच्या वडिलांना कोरोनाची लागण, माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांना कोरोना #deepikapadukone #दीपिका #prakash #coronavirus #surajyadigital #actresses #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/2YEa23jGce
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
मुंबईतील करोना परिस्थिती काही प्रमाणात सुधारत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या घटत असून, करोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. महापालिकेकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली. “फेरीवाल्यांची नोंदणी झाली आहे. फेरीवाल्यांचे झोन तयार करताना ती नोंदणी केलेली आहे. त्यामुळे जी मदतीची घोषणा केलीये, ती पूर्ण केली जाईल,” अशी माहितीही पेडणेकर यांनी दिली.
कोल्हापुरात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर https://t.co/G6YW2kfku0
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबईतील करोना परिस्थिीतबद्दल महापौर किशोर पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापौर पेडणेकर म्हणाल्या, “महापालिका लहान मुलांसाठी वार्ड तयार करण्यासाठी जागा शोधत आहे. लहान मुलांसाठी पाळणाघर तयार करण्याचाही प्रयत्न आहे. दिव्यागांसाठी घरात ठेवणं घातक ठरू शकतं. त्यामुळे या सगळ्यांचा विचार केला जात आहे. जागांचा शोध सुरू आहे. त्याप्रमाणे कारवाई केली जाईल,” असं पेडणेकर म्हणाल्या.
सोलापूर : बार्शीचा एका डोळ्याने अंध असलेला कलाकार महेश मस्के याने टरबूजावर काढलेलं हे देवेंद्र फडणवीस यांचे सुंदर चित्र #surajyadigital #image #टरबूज #beutifull #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/DVCkvLCI4L
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
“दोन तीन गोष्टींमध्येही महापालिकेला लक्ष्य घालावं लागणार आहे. खासदार अरविंद सावंत यांनीही यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. जैन मुनी आहेत, त्यांच्याकडे आधार कार्डचं नाही, त्याचबरोबर बेघर असलेल्यांचं लसीकरण कसं करणार? तसेच काही काळासाठी आलेले आहेत, पण त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही, अशा घटकांचा विचार होणं आवश्यक आहे आणि त्यांचा विचार महापालिका करत आहे. त्यांची नोंदणी करण्यासंदर्भात विचार केला जात आहे. स्थलांतरित मजुरांची माहिती आहे, त्यातून कार्यवाही केली जाईल. कारण ते लसीकरणापासून वंचित राहिले, तर करोना पुन्हा वाढत राहिलं,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
गोकुळ निवडणूक : सतेज पाटील यांच्या गटातील चार उमेदवार विजयी #kholapur #कोल्हापूर #गोकुळ #satejpatil #surajyadigital #सुराज्यडिजिटल #Gokul pic.twitter.com/hieOHD7yJa
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021
“४५ वर्षापुढील व्यक्ती आणि पहिल्या फळीतील कोविड योद्धे थेट लसीकरण केंद्रात जाऊन लसीचा दुसरा डोस घेऊ शकतात. अशी ५९ केंद्र आहेत. याची प्रत्येक वार्डला माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक वार्डच्या बाहेर या लसीकरण केंद्रांची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. वॉर रुममध्येही चालू असलेल्या लसीकरण केंद्राची मिळेल,”
किशोरी पेडणेकर – महापौर, मुंबई