नागपूर : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रायोजित केलेल्या आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या याचिकाकर्त्यांची राष्ट्रवादीच्या काही लोकांशी बैठका देखील झाल्या होत्या. आम्ही कायदा कोर्टात टिकवला होता. पण हे लोक टिकवू शकले नाहीत. तसेच, राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांना खोटे बोलण्याचा रोग जडला आहे, असा घणाघातही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारले, त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीने करून देणार – अजित पवार https://t.co/yNdvfJvdyz
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यातील विरोधी पक्षांचे नेते आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. महाविकास आघाडीच्या भूमिकेमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नसल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. देवेंद्र फडणवीस खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी मलिक यांच्यावर पलटवार केला. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील काही याचिका या ‘एनसीपी स्पॉन्सर्ड’ असल्याचा खळबळजनक आरोप फडणवीस यांनी केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू टाकला थेट केंद्र सरकारच्या कोर्टात https://t.co/FMgW5V7nZG
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘खरं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही दाखल झालेल्या याचिका या एनसीपी स्पॉन्सर्ड आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणारे तुमचे लोक आहेत. मी त्याही वेळेस सांगितलं होतं. काही लोकांची वक्तव्ये देखील आहेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत बैठकाही घेतल्या आहेत. बैठका घेऊन त्यांना तुम्ही याचिका टाकायला लावलेल्या आहेत, असा थेट आरोप करतानाच नवाब मलिक यांना खोटं बोलण्याचा रोग जडला आहे, असे टीकास्त्रही फडणवीस यांनी सोडले आहे.
बिग ब्रेकिंग – मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय https://t.co/YltUtxk1wB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021
या सरकारला माझी आठवण आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर आली. स्थगिती यायच्या आधीच्या एकाही बैठकीला मला बोलावलेलं नाही. हे सरकार विरोधकांशी चर्चा करणं कमीपणाचं मानतं. कोरोना असो की मग मराठा आरक्षण असो, ज्या वेळेस स्थगिती मिळाली आणि मग चारही बाजूंनी टीका झाली त्यानंतर सरकारने मला चर्चेला बोलावलं. पण मला चर्चेला बोलवा अथवा बोलवू नका. हा माझ्या सन्मानाचा विषय नाही. मराठा आरक्षण टिकलं पाहिजे हा माझा प्रयत्न होता आणि आमच्या सरकारने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवून दाखवलं.
मराठा आरक्षण रद्द पण विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम राहणार https://t.co/X1tRZFZVEy
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021