कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी राज्यात उफाळलेल्या हिंसाचारावर राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांनी राज्यातील हिंसाचारावरुन चिंता व्यक्त केली. आणि ममतांना संविधानाचे पालन करण्याची आठवण करुन दिली. दरम्यान, भाजपने तृणमुल काँग्रेसचे गुंड हिंसा करत असून पोलिस त्यांना मदत करत असल्याचा आरोप केला आहे.
मराठा आरक्षण आणि कोरोना : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साठेआठ वाजता जनतेला संबोधित करणार #MarathaReservation #मराठाआरक्षण #सुराज्यडिजिटल #surajyadigital #CM #सीएम #कोरोना #संवाद pic.twitter.com/c4tFRZ41iT
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल जगदीप धानखर यांनी ममता बॅनर्जी यांना शपथ दिली. दरम्यान, ममता बॅनर्जी या सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात हिंसाचार उफाळून आला आहे. भाजपा-तृणमूल यांच्याकडून एकमेकांवर हिंसाचाराचे आरोप केले जात असून, याच गदारोळातच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल जगदीप धनखार यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यानंतर राजभवनातच दोघांमध्ये खटका उडाल्याचं बघायला मिळालं.
बिग ब्रेकिंग – मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय https://t.co/YltUtxk1wB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दणदणीत २१३ जागा जिंकणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. करोनाचा उद्रेक झालेला असल्यानं साधेपणानं हा शपथविधी सोहळा पार पडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यपालांनी जगदीश धनखार यांनी त्यांना शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “करोना संकट नियंत्रणात आणण्याला सरकार प्राधान्य देणार आहे. याचसंदर्भात दुपारी बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर तीन वाजता पत्रकार परिषद घेऊ. त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलं.
Looking at the #COVID19 situation, we'e to take some steps. Wearing of masks to be mandatory, there'll be only 50% attendance in state govt offices. Shopping complexes, gyms, cinema halls, beauty parlours to be closed. Social/political gathering prohibited: WB CM Mamata Banerjee pic.twitter.com/i3LkMW3ci9
— ANI (@ANI) May 5, 2021
त्यानंतर बोलताना राज्यपालांनी बंगालमधील हिंसाचाराकडे ममतांचं लक्ष वेधलं. “निवडणूक निकालानंतर उसळेला संवेदनाहीन, भयंकर हिंसाचार संपवणे हीच आपली प्राथमिकता आहे. मला पूर्ण खात्री आहे की, कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री तत्काळ पावलं उचलतील. या परिस्थिती माझी छोटी बहीण कारवाई करेल, अशी मला आशा आहे. सरकार संविधान आणि कायद्यानुसार काम करून संघराज्य पद्धतीचा सन्मान करेल,” असं धनखार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू टाकला थेट केंद्र सरकारच्या कोर्टात https://t.co/FMgW5V7nZG
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021
राज्यपालांनी मांडलेल्या भूमिकेवर ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिलं. राज्यपालांच्या हातातील माईक हातात घेऊन ममता म्हणाल्या,”मी आजच शपथ घेतली आहे. तीन महिन्यांपासून राज्य पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या हाती होतं. निवडणूक आयोगाने या काळात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नियुक्त्याही केल्या. ज्यांनी कोणतंही काम केलं नाही. अशा परिस्थिती आपण कामाला सुरुवात करत आहोत,” असं ममता म्हणाल्या.
अकलूजमध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना अटक https://t.co/rCcZ4qFlBp
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021