सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. त्यानंतर आज पंढरपुरात न्यायालयाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात मुंडण आंदोलन केले. राज्यातील एकाही मंत्र्यांना व आमदार खासदारांना रस्त्यावरुन फिर देणार नाही. प्रसंगी त्यांच्या गाड्या फोडू असा इशारा यावेळी मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी दिला.
बिग ब्रेकिंग – मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय https://t.co/YltUtxk1wB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021
आरक्षणा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मराठा क्रांती मोर्च्याचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांच्या नेतृत्वखाली आज पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारच्या विरोधात अर्धनग्न व मुंडण आंदोलन करुन निषेध केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
'गरीब मराठा समाजावर अन्याय; संपूर्ण मराठा समाज श्रीमंत नाही', तुम्हाला फसवलं जातंय – ओबीसीचं ताट आणि गरीब मराठ्यांचं ताट वेगळं असू द्याhttps://t.co/cIgyPSRrHU
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021
आंदोलनामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे, रामभाऊ गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, स्वागत कदम, शशिकांत पाटील, धनाजी साखळकर, संदीप मुटकूळे, संतोष कवडे आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू टाकला थेट केंद्र सरकारच्या कोर्टात https://t.co/FMgW5V7nZG
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021
* सोलापुरात मराठा समाज आक्रमक
मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं रद्द केले. या निषेधार्थ सोलापुरातील काही मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मात्र आंदोलनस्थळी पोहोचताच आंदोलनकर्त्यांना सोलापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी माऊली पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकार व कोर्टाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. धिक्कार असो…धिक्कार असो राज्य व केंद्र शासनाचा धिक्कार असो अशी घोषणाबाजीही माऊली पवार यांनी केली.
सोलापूर : मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या माऊली पवार आणि भाऊ रोडगे यांना शिवाजी चौकात पोलिसांनी केली अटक #MarathaReservation #surajyadigital #आंदोलन #अटक #सुराज्यडिजिटल #मराठाआरक्षणhttps://t.co/yI5Y2rHhTd
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021
यावेळी भाऊ रोडगे यांच्यासह अन्य आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी आंदोलन होणार असल्याचे चित्र दिसू लागताच सोलापूर शहर पोलिसांनी विविध चौकात पोलिसांचा बंदोबस्त वाढविला असल्याचे सांगण्यात आले.
मराठा आरक्षण रद्द पण विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम राहणार https://t.co/X1tRZFZVEy
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021