मुंबई : अणुबॉम्बसह अन्य स्फोटके बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या युरेनियमचा सात किलोचा साठा मुंबईत जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसनं बुधवारी ही कारवाई केली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या युरेनियमची किंमत २१ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. जिगर पांड्या आणि अबू ताहिर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. या दोघांनाही १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काँग्रेस – राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक आणि शेनफेक https://t.co/NS8xMHxm3J
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
पांड्या आणि ताहिर या दोघांवर ॲटोमिक एनर्जी अॅक्ट १९६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अँटिलियासमोर सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण ताजं असतानाच आता अणुबॉम्बसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत ज्वालाग्राही अशा युरेनियमचा मोठा साठा मुंबईत जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसनं बुधवारी ही कारवाई केली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी 16 मेपासून पुन्हा मोर्चा, पुनर्विचार याचिका दाखल करणार https://t.co/wF0YNDEQSA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
जप्त करण्यात आलेले युरेनियम सात किलोपेक्षा जास्त असून बाजारात त्याची किंमत २१ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्फोटके बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जिगर पांड्या आणि अबू ताहिर अशी त्यांची नावं आहेत. या दोघांनाही १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आयपीएल पुन्हा होणार ! बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही दिले संकेत #IPL #surajyadigital #आयपीएल #सुराज्यडिजिटल #SouravGanguly #संकेत pic.twitter.com/bCjSyX14wB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
ठाण्यात राहणारा जिगर पांड्या हा युरेनियम विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीसच्या नागपाडा युनिटने सापळा रचून जिगरला अटक केली. मानखुर्द येथे राहणाऱ्या अबू ताहिरकडून त्याला युरेनियम मिळाले असल्याची माहिती चौकशीतून समोर आली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी अबू ताहिरच्या मुसक्या आवळल्या. त्यानं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी काल युरेनियमचा मोठा साठा जप्त केला.
बलात्कारप्रकरणी तुरुंगात असणाऱ्या आसारामला कोरोनाची लागण https://t.co/YeIl88v91A
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
इतक्या मोठ्या प्रमाणात युरेनियम कशासाठी आणले गेले होते, याचा तपास एटीएसकडून तपास सुरू करण्यात आला आहे. युरेनियमचा साठा तपासणीसाठी भाभा अणुशक्ती केंद्रात पाठविण्यात आला होता. बीएआरसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे युरेनियम अत्यंत घातक आहे.