पुणे : मूळच्या बुलढाण्यातील पण बारामतीकर झालेल्या पतीच्या आजारावरील ओैषधासाठी अनवाणी धावून मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करे या कोरोनाची झुंज हरल्या. त्यांच्या पतीचे भगवान करे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
काँग्रेस – राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक आणि शेनफेक https://t.co/NS8xMHxm3J
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर चर्चेत आलेल्या लता करे यांच्या पतीचं कोरोनामुळे निधन झालं आहे. लता करे यांचे पती कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होते. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. २०१३ मध्ये लता करे प्रथम पतीच्या हृदयविकारावरील उपचाराचे पैसे मिळविण्यासाठी मॅरेथॉनमध्ये कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावल्या. वयाच्या ६४ व्या वर्षी धावणाऱ्या लता त्यावेळी प्रथम क्रमांक सुद्धा मिळवला होता. त्यामुळं त्यांचं त्यावेळी कौतुक ही झालं होतं.
गेली मदत कुणीकडे ? राहुल गांधींचा सरकारला सवाल https://t.co/gZbW1HCVqq
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
त्यानंतर पुढेही सलग तीन वर्ष त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅट्रीक साधली. मात्र हृदयविकारातून पतीला वाचवणाऱ्या लता कोरोनापासून त्यांना त्या वाचवू शकल्या नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लता यांच्या पतीच्या निधनाच्या बातमीनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त करत, लता करे यांचे पती भगवान करे यांचे निधन झाले. ही अतिशय दुःखद घटना असून त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या या कठीण काळात आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत असल्याचं म्हणत, सांत्वन केलं.
त्यांच्या जीवनावर आधारीत मराठी चित्रपटास ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष पुरस्कार मध्ये जाहीर झाला आहे. दक्षिणात्य निर्माते ए कृष्णा अरुबोधु यांनी त्यांच्यावर चित्रपटाची निर्मिती केली, नविन देशबोईना यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यातही विशेष म्हणजे लता करे यांची भूमिका स्वतः लता करे यांनीच साकारलेल्या या मराठी चित्रपटास राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष पुरस्कार मिळाला.
महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; ज्वालाग्राही युरेनियमचा मोठा साठा जप्त https://t.co/3z8htgFV1O
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
बारामतीमध्ये दरवर्षी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमत्त शरद मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. या स्पर्धेतील एक स्पर्धक म्हणजेच लता भगवान करे नववारी साडी आणि डोक्यावर पदर आणि कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावणाऱ्या ६५ वर्षांच्या लताबाई करे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत लता करे यांनी सहभाग घेतला तो आपल्या कुटुंबासाठी. २०१३ मध्ये पती भगवान करे यांच्या उपचारासाठी त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावल्या आणि प्रथम क्रमांक देखील पटकवला.
मराठा आरक्षणासाठी 16 मेपासून पुन्हा मोर्चा, पुनर्विचार याचिका दाखल करणार https://t.co/wF0YNDEQSA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021