बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यानंतर आता मराठा समाज पुन्हा एकदा मोर्चा काढणार आहे. राज्यात 15 मेनंतर लॉकडाऊन संपत आहे. त्यामुळे 16 मेपासून मोर्चा काढण्यावर आज बीडमधील बैठकीत एकमत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात मोर्चा काढला जाणार आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच त्यांनी अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आयपीएल पुन्हा होणार ! बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही दिले संकेत #IPL #surajyadigital #आयपीएल #सुराज्यडिजिटल #SouravGanguly #संकेत pic.twitter.com/bCjSyX14wB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
बीडमध्ये आज मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.
बलात्कारप्रकरणी तुरुंगात असणाऱ्या आसारामला कोरोनाची लागण https://t.co/YeIl88v91A
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा आरक्षणासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना उद्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन संपल्यावर 16 तारखेला मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठा संघटनांनी घेतलेल्या या भूमिकेकमुळं राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात मोर्चे काढणार असल्याची माहिती यावेळी विनायक मेटे यांनी दिली. पहिल्या मोर्चा मोर्चाची सुरुवात बीड मधून होणार आहे.
सोलापूर : शहरातील लसीकरणसंदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिलेली माहिती #coronavirus #surajyadigital #solapur #सुराज्यडिजिटल #सोलापूर #vaccine #लस #महानगरपालिकाhttps://t.co/W444bRxmFs
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा. मराठे गप्प बसणार नाहीत, रस्त्यावर उतरतील, असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर दिला होता.
* पुनर्विचार याचिका दाखल करणार
मराठा आरक्षणासाठी लढणारे औरंगाबाद येथील विनोद पाटील पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत. विनोद पाटील सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. या याचिकेद्वारे नवीन मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं. इतर राज्यातील आरक्षणाची स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणणार आहे. इतर राज्याच्या धर्तीवर आरक्षणाची मागणी करणार असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली. सुप्रीम कोर्टानं निकाल जाहीर केल्यानंतर तीस दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करावी लागते.
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिका राष्ट्रवादीने स्पॉन्सर्ड केल्यात https://t.co/0e9rBBESTd
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 5, 2021