मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी केट्टोसोबत मिळून एक मोहिम सुरू केली आहे. याद्वारे ते कोरोना रुग्णांसाठी आर्थिक मदत जमा करणार आहेत. यामध्ये सर्वांनी मदत करावी, असे आवाहनही विराटने केले आहे. याआधी अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही अशाच प्रकारे पैसा गोळा करण्यासाठी लोकांना मदतीचे आवाहन केले होते.
तरुणांसाठी सुवर्ण संधी ! राज्यात आरोग्य विभागात १६ हजार पदांची भरती, तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी हालचालीhttps://t.co/NnD6SoPSxW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कोविड- 19 मदतनिधीला दोन कोटींची देणगी जाहीर केली आहे. कोवीड- 19 मदतनिधीसाठी 7 कोटी निधी जमवण्याच्या एका मोहिमेत त्यांनी हे दोन कोटीचे योगदान दिले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना लशीचे दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र नंबर वन, महाराष्ट्रानंतर कोणाचा नंबर ? https://t.co/S6M5si894c
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
हे दोघे केट्टो या समुदाय निधी संकलन व्यासपीठाद्वारे हा 7 कोटींचा निधी जमवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्यांनी आपले स्वतःचे दोन कोटी रुपये देऊन सुरूवात केली आहे. ‘केट्टो’ वर सात दिवस ही निधी संकलन मोहिम चालणार आहे. त्यानंतर हा निधी एसीटी ग्रांटस यांच्याकडे वळविण्यात येईल. एसीटी ग्रांटसच्या माध्यमातून अॉक्सिजन पुरवठा, मनुष्यबळ, लसीकरण जनजागृती आणि टेलीमेडीसिन सेवांसाठी मदत करण्यात येणार आहे.
सोलापूर : कडक लॉकडाऊन होणार, मग गर्दी उसळणारच, आणि गर्दीला नियम माहीत नसतो….हेच या चित्रांतून दिसत आहे. आठ दिवसांचा भाजी – पाला घेण्यासाठी प्रत्येक मंडईत गर्दी #surajyadigital #crowed #गर्दी #नियम #बंधन #सुराज्यडिजिटल #lockdown #लॉकडाऊन pic.twitter.com/98dJw8FCr8
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
विराट कोहलीने म्हटले आहे की, देशाच्या इतिहासात अभूतपूर्व अशा संकटातून आपण जात आहोत. आपण सर्वांनी एकजुटीने काम करुन जेवढे प्राण वाचवता येतील तेवढे वाचवणे गरजेचे आहे. गेल्या वर्षापासून लोकांचे हाल व पिडा पाहून मी व अनुष्का अतिशय दुःखी आहे.
सोलापूर : आठ दिवसांचा भाजीपाला घेण्यासाठी मंडईत झालेली गर्दी #solapur #सोलापूर #सुराज्यडिजिटल #गर्दी #मंडई #surajyadigital #8DAYShttps://t.co/B4Bu9OHinM
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021