अहमदनगर : संगमनेर शहरात पोलिसांवर जमावाने हल्ला केला. दिल्ली नाका परिसरातील ही घटना आहे. संचारबंदी असतांना गर्दी करु नका, अशीनृ विनंती पोलिसांनी केली. तेव्हा जमावाने पोलिसांना मारहाण करत पळवून लावले. जमावाने यावेळी पोलीस चौकीसह पोलिसांच्या गाड्यांची तसेच दुकानांचीही तोडफोड केली. दरम्यान, यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेकही करण्यात आली.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर उपचार सुरू, मृत्यूच्या अफवेने सर्वत्र गोंधळ https://t.co/kC6DcaUEqH
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात पोलिसांनी गर्दी करण्यास मनाई केल्याने जमावाने थेट पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सध्या याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
VIDEO: संगमनेरमध्ये पोलिसांवर जमावाचा हल्ला, पोलीस चौकीसह गाड्यांची तोडफोड, गुन्हा दाखल#Sangamner #Ahmednagar #AttackonPolice pic.twitter.com/gqoIN0v9Ed
— Pravin Sindhu Bhima Shinde 🇮🇳✊ (@PravinSindhu) May 7, 2021
हल्ल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्यासह संगमनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मुकुंदराव देशमुख यांनी घटनास्थळी येऊन जमावाला पांगवलं. तसेच 6 आरोपींसह अज्ञात जमावावर गुन्हा नोंदवण्यात आला.
उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या खिचडीमध्ये अडकले – संजय काकडे #MahaVikasAghadi #UddhavThackeray #political #ठाकरे #surajyadigital #सुराज्यडिजिटलhttps://t.co/myl4xd3WnE
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
संचारबंदी काळात पोलीस पथक गस्त घालत होतं. मात्र, दिल्ली नाका परिसरात गर्दी जमा झाल्याचं दिसल्याने पोलिसांनी त्यांना गर्दी का केली अशी विचारणा केली. मात्र, जमावाने पोलिसांवरच हल्ला केला. सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. पोलिसांनी 6 जणांसह अज्ञात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचाही आरोप होत आहे.
पोलिस आयुक्तांनी वेषांतर करुन केली पोलीस ठाण्याची झाडाझडती, होतंय कौतुक https://t.co/rLUbLCbQmv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
हल्ला करणाऱ्या जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांचा पाठलाग करत हल्ला केल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे. हल्लेखोरांनी यावेळी पोलीस चौकीसह पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात या दहा जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पाऊस #rain #surajyadigital #मुसळधार #पाऊस #महाराष्ट्र #Maharashtra #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/UsJDdXFWog
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021