पुणे : पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी वेषांतर करून पोलिस ठाण्यातील ‘खाकी’ वर्दीच्या कामकाजाची स्वत: अनुभूती घेतली. कृष्णा प्रकाश यांनी वेषांतर केल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. शिवाय, त्यांच्या कामाचे नेटिझन्स कौतुक करत आहेत.
महाराष्ट्रात या दहा जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पाऊस #rain #surajyadigital #मुसळधार #पाऊस #महाराष्ट्र #Maharashtra #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/UsJDdXFWog
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी वेषांतर करून पोलीस ठाण्यातील ‘खाकी’ वर्दीच्या कामकाजाची स्वत: अनुभूती घेतली. यात त्यांना चांगले आणि कटु अनुभव आले. या प्रकरणात पिंपरी पोलिसांना मेमो बजावणार असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
बुधवारी मध्यरात्री सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे आणि इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस आयुक्तांनी वेषांतर करून नाकाबंदीच्या ठिकाणी आणि तीन पोलीस ठाण्यांत पाहणी करून पोलिसांची परीक्षा घेतली. मात्र, या परीक्षेत तक्रारदार म्हणून सामोरे गेलेल्या पोलीस आयुक्तांना पिंपरी ठाण्यात पोलिसी खाक्याचा कटू अनुभव आला, तर हिंजवडी, वाकड ठाण्यांमध्ये चांगला अनुभव आला. तक्रारदार पोलीस आयुक्तच असल्याचे समोर आल्यावर मात्र, उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
चीनचे भरकटलेले २१ टन वजनाचे रॉकेट उद्या पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता https://t.co/3gyUm2lwSy
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्यांना कशी वागणूक मिळते, याची परीक्षा पाहण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बुधवारी रात्री चक्क मुस्लिम पठाणाचे रूप धारण केले.
दाढी चिकटवून, डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग चढवला, तसेच सलवार, कुर्ता आणि तोंडावर मास्कही लावला. एवढेच नाही तर त्यांची पत्नी म्हणून सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी तसेच कर्मचारी स्वप्नील खेतले आणि पोलीस आयुक्तांचे वाहनचालक यांनीदेखील वेषांतर केले. वेषांतर केलेले हे मुस्लिम दाम्पत्य खासगी टॅक्सी करून रात्री सव्वाबाराला पिंपरी पोलीस ठाण्यात आले. आम्ही पिंपरीतील म्हाडा प्रकल्पात राहत असून, शेजारच्या महिलेला रूग्णवाहिका पाहिजे.
कोरोना संकट – विराट कोहलीची मोठी घोषणा https://t.co/iHX3zBSbCY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, रूग्णवाहिका चालक पैसे खूप मागतोय. तुम्ही तक्रार दाखल करुन घ्या, अशी विनंती केली. मात्र, तुम्ही तुकाराम चौकात जा, तेथे काय सांगायचे ते सांगा, असे उत्तर उपस्थित कर्मचाऱ्याने दिले. त्यावर इतक्या रात्री कुठे फिरणार येथेच तक्रार दाखल करून घ्या, अशी विनंती करूनही तक्रार दाखल करून घेतली नाही. पोलीस आयुक्तांनी मास्क काढल्यानंतर त्या पोलीसाला अक्षरश: घाम फुटला.
राष्ट्रवादी कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांना राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी घरी जाऊन दम देवून जाब विचारला, मराठा आरक्षणाच्या निर्णयाशी राष्ट्रवादीचा संबंध नाही #political #surajyadigital #राष्ट्रवादी #MarathaReservation #NCP #तोडफोड #मराठाआरक्षणhttps://t.co/cabN8QQlB1
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
त्यानंतर हे दाम्पत्य हिंजवडी पोलीस ठाण्यात गेले. आमच्या परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, काही लोकांना बोललो तर त्यांनी बायकोची छेड काढली, मला मारहाण केली, अशी तक्रार हिंजवडी पोलिसांना दिली. त्यावेळी ड्युटीवरील पोलिसाने फिर्याद घेतली. आपण वरिष्ठांना बोलावतो, तोपर्यंत थांबण्याची विनंती केल. काही वेळाने पोलीस आयुक्तांनी ओळख सांगितल्यानंतर कर्मचाऱ्याची भंबेरी उडाली. वाकड पोलिस ठाण्यातही पोलीस आयुक्तांना उपस्थित कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
“पोलीस ठाण्यात कर्मचारी खरोखर कसे काम करतात, सामान्य नागरिकांशी कसे वागतात, यासाठी अशा प्रकारे वेषांतर करून अचानक भेट दिली. पिंपरीत वाईट अनुभव होता. मात्र,वाकड व हिंजवडीत चांगला अनुभव आला. यापुढेही अशा प्रकारे अचानक भेट देणार आहे”
कृष्णा प्रकाश – पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड