मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतला कोरोनाची लागण झाली आहे. तिने याबाबत स्वत: माहिती दिली आहे. दरम्यान, बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होऊ लागला आहे. अनेक दिग्दर्शक, अभिनेते कोरोनाशी झुंज देत आहे. आता अभिनेत्री कंगना रणौत देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तिचे चाहते सोशल मीडियावर ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
Actor Kangana Ranaut says she has tested positive for COVID-19 pic.twitter.com/1hID9OKsU7
— ANI (@ANI) May 8, 2021
अभिनेत्री कंगना रणौतने याबाबत स्वत: माहिती दिली आहे. सध्या ट्विटरपासून दूर असणाऱ्या कंगनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. तिने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला थकल्यासारखं आणि डोळ्यात जळजळ होण्यासह अशक्त वाटत होतं. हिमाचलला जाता येईल असं वाटत होतं म्हणून मी काल माझी चाचणी केली आणि आज मी कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहे.’
औरंगाबाद : नातेवाईकांचा कोरोना रुग्णांसोबत रुग्णालयातच मुक्काम, नातेवाईकच बनतायात 'सुपर स्प्रेडर' https://t.co/3Mus0FqO4r
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कंगनाने पुढे असं म्हटलं आहे की, ‘मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे. मला काही कल्पनाच नाही आहे की हा व्हायरस माझ्या शरिरात पार्टी करतोय, आता मला एवढं माहिते की मी त्याला संपवेन, कोणत्याही शक्तिला तुमच्यापेक्षा वरचढ होऊन देऊ नका, तुम्ही जर घाबरलात तर ते आणखी तुम्हाला घाबरवेल. चला या कोविड-19 चा विनाश करूया, हा काही नाही आहे फक्त एक ठराविक काळाकरता आलेला ताप आहे ज्याला जास्त प्रसिद्धी मिळाली आणि काही लोकांना तो मानसिक त्रास देत आहे. हर हर महादेव’.
तामिळनाडूमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा #surajyadigital #तामिळनाडू #TamilnaduNews #घोषणा #सुराज्यडिजिटल #declare pic.twitter.com/yM6ZLkAemv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
मासे वाहतुकीचा ट्रक पलटी, फुकटचे मासे नेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड https://t.co/Dr0hSl9Jyc
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021