औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशातच औरंगाबादेत कोरोना रुग्णांचे नातेवाईक रुग्णांसोबत रुग्णालयातच मुक्काम करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे रुग्णांचे नातेवाईक सुपर स्प्रेडर बनत असल्याचे समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयातील जनरल वॉर्डपासून ते आयसीयूपर्यंत नातेवाईकांचीच गर्दीच गर्दी दिसत आहे. तसेच, रुग्णालय प्रशासन नातेवाईकांना कोविड वॉर्डमध्ये सोडतातच कसे? असा सवाल केला जात आहे.
'औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भर रस्त्यात चोपलं पाहिजे' https://t.co/8JpO0bAPMu
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
औरंगाबादेत कोरोना रुग्णांचे नातेवाईक रुग्णांसोबत रुग्णालयातच मुक्काम करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे औरंगाबादकर भयभीत झाले आहेत. त्यामुळेच डॉक्टर रुग्णावर नीट उपचार करणार नाहीत, या भीतीपोटी नातेवाईक रुग्णालयात थांबत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. तर, दुसरीकडे नातेवाईकांच्या या वेडसरपणामुळे कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
औरंगाबादमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना रुग्णांचे नातेवाईक त्यांच्या रुग्णांसोबत रुग्णालयात मुक्काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा फैलाव होत असल्याचं माहीत असतानाही हे नातेवाईक रुग्णांजवळ थांबून सुपर स्प्रेडर बनत असल्याने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अभिनेते अनुपम खेर यांना मिळाला न्यूयॉर्कमध्ये पुरस्कार https://t.co/KkxDJBUBlM
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
प्रत्येक रुग्णासोबत एक किंवा दोन नातेवाईक कॉट शेजारी बसून असल्याचं दिसत आहे. नातेवाईकच रुग्णासोबत तास न् तास बसून राहत असल्याने हे नातेवाईक कोरोना स्प्रेडर होण्याची भीती बळावली आहे. जिल्हा रुग्णालयातील जनरल वॉर्डपासून ते आयसीयूपर्यंत नातेवाईकांची गर्दीच गर्दी दिसत आहे. रात्र न् दिवस नातेवाईक रुग्णालयात थांबत आहेत. हे नातेवाईकच कोरोनाचे सुपर स्प्रेडर बनत असल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. तर रुग्णालय प्रशासन नातेवाईकांना कोविड वॉर्डमध्ये सोडतातच कसे? असा सवाल केला जात आहे. मात्र, नातेवाईक कोविड वॉर्डात थांबत असल्याच्या वृत्ताने औरंगाबाद चांगलेच हादरून गेले आहे.
जमावाचा पोलिसांवर हल्ला, दगडफेक; पोलिसांनाच पळवून लावले, पहा व्हिडिओ
https://t.co/DhuIRCLOvr— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021