सोलापूर : हत्तूरचे (ता. दक्षिण सोलापूर) माजी सरपंचांनी स्वतःच्या घरी बंदुकीतून कानशिलात गोळी झाडात आत्महत्या केली आहे. विजापूर नाका पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ https://t.co/VKJOwV5YYk
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
माजी सरपंच इब्राहिम दस्तगीर नदाफ (वय 65) यांनी शनिवारी अज्ञात कारणावरून स्वतःच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, इब्राहिम नदाफ हे आजारी होते. त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपूर्वी बायपास सर्जरीही झाली होती. त्यानंतर त्यांच्या पोटात दुखत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शनिवारी त्यांच्या मुलाने त्यांना दवाखान्यात दाखवून घरी आणले होते. रात्री जेवण करून सर्वजण झोपण्याची तयारी करीत होते. त्रास होऊ लागल्याने इब्राहिम नदाफ अस्वस्थ होते. रात्री अकराच्या सुमारास घरासमोरील जुन्या वाड्यात गेले. जाताना त्यांनी घरातील त्यांची परवानाधारक बंदूक नेली. घरातील लोक त्यांची शोधशोध करीत होते. दरम्यान, जुन्या वाड्यातून बंदुकीचा आवाज आला. मुलगा व पत्नीने धावत जाऊन पाहिले तर ते जमिनीवर पडले होते. त्यांच्या हातात बंदूक होती. हा प्रकार त्यांनी शेजारील लोकांना सांगितला.
हैदराबाद : नियम पायदळी तुडवत प्रसिद्ध मक्का मशिदीत जमली मोठी गर्दी #surajyadigital #makkah #मस्जिद #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/0Dk4nWp8Ow
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
विजापूर नाका पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. रात्रीच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नदाफ यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. रविवारी शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर हत्तूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.