मुंबई : महाविकास आघाडीत पुन्हा एकदा बिघाडी झाली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेऊन काँग्रेस पक्षाशिवाय देशात कुठलीही आघाडी होऊ शकत नसल्याचे म्हटले. यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांची खिल्ली उडवली. संजय राऊत काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही. तसेच सामना देखील वाचत नाही. केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, असेही ते म्हणाले.
देशाला एका उत्तम विरोधी आघाडीची गरज आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही आदर्श आघाडी आहे. राष्ट्रीय पातळीवरही अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती सध्या ठीक नाही, पण लवकरच यासंदर्भात हालचाली सुरू होतील, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी दिली.
हत्तूरच्या माजी सरपंचाने गोळी झाडून केली आत्महत्या https://t.co/dQJ7boiXMY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
राऊत यांनी शनिवारी शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी रविवारी माध्यमांना दिली. जशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी काम करत आहे, अशाचप्रकारे आघाडी आपण देशात उभी करू शकतो का, यासंदर्भात पवार यांच्याशी चर्चा झाली.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जी मुसंडी मारली ती जबरदस्त आहे, पण भविष्यात देशात एक आघाडी निर्माण व्हावी, ही सगळ्यांची इच्छा आहे. त्यासाठी नवीन नेतृत्वच हवे असे नाही, पण एकत्र बसून ठरवायला हवे, असे ते म्हणाले.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळवून महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केले होते. मात्र अनेकवेळा या तिन्ही पक्षात खटके उडत असलेले पाहायला मिळाले होते. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्द्यावरून आघाडीत मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसलाही चांगलेच खडेबोल सुनावले होते. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
सोलापूर बाजार समितीचे माजी संचालक प्रवीण देशपांडे यांचे निधन https://t.co/m7Pz1R529g
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याबाबत नाराजी देखील नाना पटोले यांनी बोलावून दाखवली आहे. संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही. तसंच सामना देखील वाचत नाही. खरं म्हणजे संजय राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात. पण केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, हे कदाचित संजय राऊत यांना माहिती नसावं, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
प्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्रीनं फक्त 150 रुपयांत केलं लग्न! अंगठीच्या जागी रबर बँडhttps://t.co/0wZgspRQiH
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021
नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचं भयावह चित्र संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. यावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, भाजपला 24 तास फक्त सत्ता पाहिजे, देशात कोरोनाच्या चितेमध्ये लोक जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र प्रचारात लागले होते, अशी टाकी नाना पटोले यांनी केली आहे.
दरम्यान, प्रत्येकाला वाटते मीच नेता आहे, पण तसे नाही, आघाडी अशी निर्माण होत नाही. भविष्यात विरोधी पक्षाची भक्कम आघाडी उभी करावी आणि एक आव्हान उभे करावे, अशी सगळ्यांची इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही. अलीकडच्या निवडणुकांत काँग्रेसला यश मिळाले असले तरी काँग्रेसने अजून मुसंडी मारणे जास्त गरजेचे आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
हैदराबाद : नियम पायदळी तुडवत प्रसिद्ध मक्का मशिदीत जमली मोठी गर्दी #surajyadigital #makkah #मस्जिद #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/0Dk4nWp8Ow
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021