सोलापूर : उद्योजक प्रवीण विष्णुपंत देशपांडे (वय 63) यांचे अल्प आजाराने पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते माजी संचालक होते. दक्षिण सोलापूरच्या सीना भीमा नदीच्या खोऱ्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व होते.
एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ https://t.co/VKJOwV5YYk
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
सहकार, कृषी, पणन क्षेत्रातील ते नामांकित व्यक्तिमत्व होते. बालाजी उद्योग समूहच्या माध्यमातून त्यांचा अनेक कृषीपूरक वस्तू उत्पादन, विक्री व्यवसाय होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंद्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सभापती दिवंगत गोपाळ कोरे यांच्या सहकार्याने दोनदा संपूर्ण पॅनल निवडून आणले होते.
हत्तूरच्या माजी सरपंचाने गोळी झाडून केली आत्महत्या https://t.co/dQJ7boiXMY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
माजी आमदार दिलीप माने समर्थक अशी त्यांची ओळख होती. दिलीप माने यांच्या कित्येक राजकीय खेळीत त्यांनी साथ दिली होती. सहा दिवसांपूर्वी त्यांच्या सख्या भावाचे प्रदीप देशपांडे यांचे निधन झाले होते. त्या नंतर देशपांडे परिवारास मोठा धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
हैदराबाद : नियम पायदळी तुडवत प्रसिद्ध मक्का मशिदीत जमली मोठी गर्दी #surajyadigital #makkah #मस्जिद #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/0Dk4nWp8Ow
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021