सोलापूर / पुणे : उजनी धरण उशाला अन कोरड घशाला ही बाब नवीन नाही. पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकर्यांसमोर पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
मोठा दिलासा; आज राज्यात 61,607 रूग्ण झाले कोरोनामुक्त #coronavirus #कोरोनामुक्त #surajyadigital #दिलासा #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/joPvB4KTs7
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
गेल्या वर्ष-सव्वा वर्षात राज्यात कोरोना महामारीचे संकट, शासनाचा लाॅकडाऊन व अतिवृृृष्टी व अवकाळी पावसाचे संकट यामुळे बळीराजा आधीच मेटाकुटीला आला आहे.उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. कडक लाॅकडाऊनच्या काळात इंदापुरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ येवुन ठेपल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
सध्या उजनीतून एकूण ४ हजार १८१ क्युसेसने पाणी विसर्ग सोलापूर भागासाठी सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी एक ते दोन दिवसात खालावत जाण्याची शक्यता आहे. इंदापूर व पूणे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मोठ्या हालचाली; शिवसेनेवर काँग्रेसचा हल्लाबोल https://t.co/oubIrCrctg
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* शेतकऱ्यांची प्रचंड धडपड
उजनी धरणाच्या पाण्यावर पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास हजार हेक्टरपेक्षा अधिक शेती अवलंबून आहे. सोलापूर व उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भागासाठी धरणातून पाण्याचे आवर्तन पूर्ण करण्यात आले असल्याने सोलापूरला पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाही. पण धरणातील पाण्याने तळ गाठल्याने आधीच आर्थिक संकटाने पूर्णपणे खचून गेलेल्या शेतकर्यांकडून उभ्या केलेल्या पिकांना जगविण्यासाठी प्रचंड धडपड सुरू असल्याचे दिसत आहे.मात्र, इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांवर पुन्हा एकदा पाण्याचे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.
सोलापूर बाजार समितीचे माजी संचालक प्रवीण देशपांडे यांचे निधन https://t.co/m7Pz1R529g
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
* आजची उजनीची स्थिती
आज सोमवारी ( ता. १०) सकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात २.७० टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. धरणाची पाणी पातळी ४९१.१३५ मीटर इतकी असून उपयुक्त पाणीसाठा १.४४ टीएमसी इतका शिल्लक आहे.तर उजनी धरणातुन सिना-माढा बोगदा २९६ क्युसेस, दहिगाव एलआयएस (फाटा) ८५ क्युसेस, उप कॅनल (फाटा) ६५० क्युसेस, व मुख्य कॅनलमधून सोलापूरसाठी ३१५० क्युसेसने पाणी विसर्ग गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे.
हत्तूरच्या माजी सरपंचाने गोळी झाडून केली आत्महत्या https://t.co/dQJ7boiXMY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021