मुंबई : म्यूकोर्मिकोसिसशी हे एक गंभीर बुरशीजन्य इन्फेक्शन आहे. हा रोग इम्यूनोकॉम्प्रेशन, ऑक्सिजन लेव्हल कमी होणे, दीर्घकाळ हॉस्पिटलायझेशन यासारख्या विविध कारणांमुळे उद्भवतो. हे इन्फेक्शन तोंड, नाक आणि घशात उद्भवते आणि नंतर ते डोळे, मेंदू आणि संपूर्ण शरीरात पसरते. त्या व्यतिरिक्त फुफ्फुसं, पोट, किडनीसारख्या इतर अवयवांवर देखील होतो. एकदा मेंदूत याची लागण होण्यास सुरुवात झाली तर ती जीवघेणी बनू शकते.
कोरोना नामक संकटाने घेरून जवळ जवळ एक वर्ष झाले, तरी देखील अजूनही या रोगाची व्यापकता आणि जटिलता आपल्याला समजली नाहीये. यामुळे असे निदर्शनास आले आहे की, शरीराच्या कोणत्याही भागामध्ये कुठलेही लक्षणे किंवा रोग हे पोस्ट कोविड (कोविड झाल्यानंतरचे) कॉम्प्लिकेशन्स असू शकतात. उदाहरणार्थ, कोविड संक्रमणानंतर हृदय, यकृत, मूत्रपिंड, दात आणि जबडे, डोळे इत्यादींसारख्या विविध अवयव आणि प्रणालींवर परिणाम होण्याची प्रकरणे बऱ्याच प्रमाणात आढळून येत आहेत.
महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार, नाशिकमध्ये 22 मे पर्यंत वाढवला, कोल्हापुरात लवकरच घोषणा #surajyadigital #कोल्हापूर #नाशिक #lockdown #सुराज्यडिजिटल #Maharashtra #लॉकडाऊन pic.twitter.com/wTXvE5NXhm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
* म्यूकोर्मिकोसिस कसा होतो?
हा संसर्गजन्य आजार नाही. आपल्या आजूबाजूला असलेली बुरशी आणि त्यांचे स्पोअर्स नाकाद्वारे किंवा एखाद्या जखमेवाटे शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. जर इम्युनिटी कमी असेल तर ही बुरशी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये शिरते आणि अवयव निकामी करू लागते.
या दुर्मिळ बुरशीजन्य संसगामुळे ग्रस्त रुग्णाला श्वास घ्यायला अडथळा, दात हलणे, जबडा दुखणे, तोंडाची दुर्गंधी, एका बाजूचे नाक गच्च होणे, डोळे सुजणे, डोळ्यांची मर्यादित हालचाल, घसा खवखवणे, घसा दुखणे आणि सूजलेल्या भागावर काळे डाग पडणे, अशी लक्षणे दिसतात. कधी कधी ताप, पोटामध्ये दुखणे, रक्तासह किंवा काळसर उलटी होणे, पोट फुगणे असे देखील लक्षणे दिसतात. एकदा ही लक्षणे निदर्शनात आल्यावर त्वरित वैद्यकीय मदत घेणे फार महत्वाचे आहे.
सलमान खानच्या दोन्ही बहिणींना कोरोनाची लागण #salmankhan #सलमान #खान #surajyadigital #सुराज्यडिजिटल #coronavirus #Arpita #aloevera pic.twitter.com/P1L1JDPixM
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* उपचार कसा केला जातो?
या रोगाचे निदान सीटी किंवा सीबीसीटी स्कॅन आणि एंडोस्कोपीच्या सहाय्याने केले जाऊ शकते. एकदा संसर्ग आढळल्यास रुग्णाला अँटीफंगल थेरपी दिली जाते. जर संसगार्मुळे आपल्या अवयवांवर त्रास होत असेल तर रुग्णाला सर्जरी करावी लागते. रुग्णांनी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि उपचारांना उशीर करू नये. या आजारामध्ये ४०% पेक्षा जास्त एवढा मृत्यूचा धोका आहे. तसेच बाधित भाग काढून टाकणे आवश्यक असल्याने शारीरिक व्यंगासह जगावे लागू शकते .
उजनीने गाठला तळ, शेतक-यांवर ओढवणार जलसंकट
https://t.co/0YKGBPvfNV— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
* म्यूकोर्मिकोसिस कसे टाळावे?
नियमित मास्क घालणे, नियमितपणे हात धुणे, नाक स्वच्छ ठेवणे, डोळ्यांची चाचणी करणे. कुठल्याही दमट, अस्वच्छ ठिकाणी जाणे टाळावे, शिळे अन्न खाणे टाळावे, आपला परिसर, घर, किचन व फ्रिज स्वच्छ ठेवावे . कुठेही बुरशी येणार नाही याची काळजी घ्या. बुरशीचे बीजकण धूळ-माती मध्ये असू शकतात, त्यामुळे धुळीच्या ठिकाणी जाणे. या काळामध्ये शरीरावर काही जखमा झाल्या तर त्यांची योग्य काळजी घ्या.
मोठ्या हालचाली; शिवसेनेवर काँग्रेसचा हल्लाबोल https://t.co/oubIrCrctg
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
* राजेश टोपे यांची मोठी घोषणा
कोरोनामुक्त झालेल्या काही जणांना म्यूकोर्मिकोसिसशीचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार या आजाराविषयी जनजागृती केली जाणार आहे. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्यूकोर्मिकोसिसशीच्या रुग्णांवर मोफत उपचार व खासगी रुग्णालयांना यासंदर्भातील औषधे कमी किमतीत उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रयत्न केले जाणार आहेत.
हत्तूरच्या माजी सरपंचाने गोळी झाडून केली आत्महत्या https://t.co/dQJ7boiXMY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021