मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, पण मृतांची संख्या अद्याप कमी होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक जण मुंबई सोडून इतर शहरांमध्ये स्थलांतर होत आहेत. प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचे कुटुंबही त्यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर राहण्यास गेले आहे. मात्र हृतिक रोशन जुहूमधील त्याच्या अपार्टमेंटमध्येच राहत आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे.
काळ्या बुरशीजन्य म्युकोरोमायकॉसिस नावाच्या आजाराबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे अधिक माहिती देताना #surajyadigital #आजार #आरोग्यमंत्री #बुरशीजन्य #सुराज्यडिजिटल #माहिती #informationhttps://t.co/8JjtTDyoIu
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
मुंबईत कोरोना विषाणूचा कहर काहीसा कमी झाला असला तरी मृतांची संख्या अद्याप कमी होताना दिसत नाही. अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना बेड, रुग्णालये आणि ऑक्सिजन या सर्व गोष्टींची कमतरता भासत आहे. अशा काळात सामान्य नागरिकांपासून ते बॉलिवूड मंडळींपर्यंत ज्यांची इतर ठिकाणी राहण्याची सोय आहे, असे अनेकजण मुंबई सोडून इतर शहरांमध्ये स्थलांतर होत आहेत.
मराठा आरक्षण : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिले प्रत्युत्तर https://t.co/gO2c6h2fw4
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनचे कुटुंबही त्यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर राहण्यास गेल्याची माहिती समोर आली आहे. हृतिक रोशनचे मुंबई शहरापासून दूर खंडाळ्यामध्ये स्वत:चा एक आलिशान फार्म हाऊस आहे. हृतिक रोशनच्या कुटुंबातील सदस्य फार्महाऊसमध्ये राहायला गेले असले तरी सध्या हृतिक रोशन मात्र जुहूमधील त्याच्या अपार्टमेंटमध्येच राहत आहे. हृतिकचे कुटुंब काही आवश्यक वस्तू घेऊन फार्महाऊसमध्ये राहायला गेले आहे. हृतिकचे वडील राकेश रोशन हे फक्त मुंबईत महत्त्वाची बैठक किंवा इतर कोणते महत्त्वाचे काम असल्यासच येतात, असे सांगण्यात येत आहे.
नियमांची ऐशीतैशी; मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी, ट्वीट केलेला पहा व्हिडिओ https://t.co/64OEngLYvU
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
नुकतेच राकेश रोशन आणि पिंकी रोशन यांनी त्यांचा लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी राकेश आणि पिंकीने वधू-वरांसारखे कपडे घातले होते. पिंकी यांनी मेंहदीही लावली होती आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले. राकेश रोशन आणि पिंकी रोशन एकमेकांवर खूप प्रेम करतात. आयुष्यात अनेक चढ-उतार आले, परंतु त्यांनी प्रत्येक प्रसंगला हसत-खेळत तोंड दिले. व्हिडिओ आणि फोटो शेअर करून आपल्या जीवनाचा हा सुंदर प्रवास शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर पिंकी रोशनने एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये लिहिले होते ‘दुल्हा आया गया’.
५० लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने फेटाळला https://t.co/j5oEugViAq
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021