नवी दिल्ली : गंगा नदीत मृतदेह तरंगताना आढळल्याने उत्तर प्रदेश व बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील चौसा स्मशान घाटात नदीत ४० पेक्षा जास्त मृतदेह वाहत आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. तसेच यांचा मृत्यू कोरोनाने झाला असावा व लाकडं जाळायला नसल्याने त्यांना नदीत फेकून दिले असावे, अशी गावकऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्येही अशीच घटना समोर आली आहे.
पंढरपूर पोटनिवडणूक : दोन शिक्षकांचा मृत्यू, एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू https://t.co/9HnBt32AAN
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
बिहारमधील बक्सरमध्ये गंगा नदीतून ४०हून अधिक मृतदेह वाहत आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी समोर आली. उत्तर प्रदेशच्या सीमेलगत चौसा शहरात हे मृतदेह वाहत येऊन नंतर नदीच्या किनाऱ्याला लागले. हे मृतदेह करोनाबाधितांचे असल्याची तसेच त्यांचे दहन वा दफन करण्यासाठी जागा न मिळाल्याने अंत्यसंस्काराच्या नावाखाली ते नदीत टाकले गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे परिसरात करोनाचा संसर्ग पसरण्याच्या भीतीमुळे स्थानिक दहशतीखाली आहेत.
या मृतदेहांच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेश व बिहार यांच्यात दोषारोपांचे सत्र सुरू झाले आहे. शनिवारी हमीरपूर शहरात अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह यमुना नदीत तरंगत असल्याचे दृश्य दिसले होते.
म्यूकोर्मिकोसिसशी नावाचा आला आजार, ४०% पेक्षा जास्त मृत्यूचा धोका, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा https://t.co/4a4aUaPLpU
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
एकीकडे करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने अनेक ठिकाणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत असल्याचं चित्र आहे. यादरम्यान गंगेच्या किनारी कोरोना रुग्णांचे मृतदेह वाहून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे प्रशासन चिंतेत आहे. बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी लागलेला मृतदेहांचा ढीग पाहून गावकरीदेखील घाबरले आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, चौशा शहरात हा प्रकार घडला आहे.
महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार, नाशिकमध्ये 22 मे पर्यंत वाढवला, कोल्हापुरात लवकरच घोषणा #surajyadigital #कोल्हापूर #नाशिक #lockdown #सुराज्यडिजिटल #Maharashtra #लॉकडाऊन pic.twitter.com/wTXvE5NXhm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
सकाळी जेव्हा गावकरी नदी किनाऱ्यावर गावकरी पोहोचले तेव्हा तेथील चित्र पाहून त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी तात्काळ प्रशासनाला यासंबंधी माहिती दिली. हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. संबंधित करोना रुग्णांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी किंवा दफन करण्यासाठी जागा मिळाली नसावी असा अंदाज आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“४० ते ४५ मृतदेह पाण्यात तरंगत होते,” अशी माहिती चौशा जिल्ह्याचे अधिकारी अशोक कुमार यांनी दिली आहे. अशोक कुमार यावेळी घटनास्थळी महादेव घाट येथे उभे राहून बोलत होते. हे मृतदेह पाण्यात फेकून दिले असावेत अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मृतदेहांची संख्या १०० पर्यंत जाऊ शकते असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
“हे मृतदेह गेल्या पाच ते सात दिवसांपासून पाण्यात असल्याने फुगले आहेत. आम्ही त्यांची विल्हेवाट लावत आहोत. हे मृतदेह उत्तर प्रदेशातील बहारिच, वाराणसी किंवा अलाहाबाद यापैकी कोणत्या शहरातील आहेत याचा तपास करणार आहोत,” अशी माहिती के के उपाध्याय या अधिकाऱ्याने दिली आहे. “हे मृतदेह येथील नाहीत, कारण आमच्याकडे मृतदेह पाण्यात सोडण्याची परंपरा नाही,” असंही ते म्हणाले आहेत.
सलमान खानच्या दोन्ही बहिणींना कोरोनाची लागण #salmankhan #सलमान #खान #surajyadigital #सुराज्यडिजिटल #coronavirus #Arpita #aloevera pic.twitter.com/P1L1JDPixM
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021
दरम्यान या मृतदेहांमुळे पाण्यातून संसर्ग फैलावण्याची भीती सध्या शहरात आहे. मृतदेहांचा खच लागला असून अनेक श्वानदेखील त्याठिकाणी दिसत होते. यामुळे स्थानिकांच्या मनात खूप भीती आहे. करोनाची लागण होण्याची भीती असून गावकऱ्यांनी हे मृतदेह दफन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मृतदेहांवरुन सध्या बिहार आणि उत्तर प्रदेशात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
बक्सरचे एसडीओ के. के. उपाध्याय यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या माहितीनुसार, हे मृतदेह फुगलेल्या अवस्थेत असून किमान पाच ते सात दिवस पाण्यात असण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. ते उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरातील आहेत- बहराइच, वाराणसी की अलाहाबाद यांचा तपास करण्याची गरज आहे. हे स्थानिक मृतदेह नाहीत, या भागात मृतदेह नदीत टाकण्याची प्रथा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.