नवी दिल्ली : कोविशिल्ड लसीचे ५० लाख डोस युकेला पाठवण्याचा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा प्रस्ताव मोदी सरकारने फेटाळला आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही केंद्र सरकारने सिरमची विनंती फेटाळून लावली आहे. सिरमकडून युकेला लस पुरवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्याआधारे ही विनंती करण्यात आली होती.
अनेक मृतदेह वाहत येत आहेत, युपी बिहारमध्ये खळबळ, संख्या शंभरपर्यत जावू शकते, यूपी -बिहारमध्ये दोषारोप
https://t.co/rQr5G7Aro7— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सिरमशी संपर्क साधत लवकरात लवकर लसींचे डोस मिळवण्याची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितलं आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसींच्या कुप्यांवर असणारे लेबल बदलावे लागणार आहेत. युकेला पुरवठा करण्यासाठी पँकिंग करण्यात आल्याने त्यांच्यावर वेगळे लेबल होते. पण आता स्थानिक बाजारात जाणार असल्याने कुप्यांवरील लेबल बदलावे लागतील.
पंढरपूर पोटनिवडणूक : दोन शिक्षकांचा मृत्यू, एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू https://t.co/9HnBt32AAN
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताला सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहिमेलाही जबर धक्का बसला आहे. यामुळे देशात निर्माण होणाऱ्या लसींचा पुरवठा सर्वात आधी राज्यांना केला जावा आणि त्यानंतरच निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सिरमला परवानगी नाकारण्यात आली आहे.
म्यूकोर्मिकोसिसशी नावाचा आला आजार, ४०% पेक्षा जास्त मृत्यूचा धोका, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा https://t.co/4a4aUaPLpU
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
राज्यांना त्यांच्या मागणीनुसार पुरवठा व्हावा यासाठी सिरमशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं आहे. देशात सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण केलं जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यांकडून मागणी होत आहे.
सलमान खानच्या दोन्ही बहिणींना कोरोनाची लागण #salmankhan #सलमान #खान #surajyadigital #सुराज्यडिजिटल #coronavirus #Arpita #aloevera pic.twitter.com/P1L1JDPixM
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 10, 2021