सोलापूर : सोलापूरच्या पाणीप्रश्नाबाबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तुमची कामगिरी एकदम बेकार सुरू आहे. भूसंपादनाची नुकसानभरपाई ५५ कोटींवरून १३० कोटींवर गेलीच कशी, याची चौकशी करा. मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर यांची एक समिती करून अहवाल पाठवा. आम्ही निधी उपलब्ध करून देऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
आमदार प्रणिती शिंदे यांनी गरजूंसाठी स्वत: लाटल्या पोळ्या https://t.co/IlIlYuYqIz
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
सोलापूरच्या पाणीप्रश्नावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना खडेबोल सुनावले आहे. उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या प्रलंबित कामांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी काल मंगळवारी मुंबईतून व्हीसीद्वारे बैठक घेतली.
वर्ध्यात सापडले मुघलकालीन चार किलो सोने https://t.co/39xtai7BsZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या प्रलंबित कामांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी मुंबईतून व्हीसीद्वारे बैठक घेतली. जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक, आमदार प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेवक महेश कोठे, चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, किसन जाधव आदींनी या बैठकीत सहभाग नोंदविला.
भारतीय महिलेच्या घरावर रॉकेट हल्ला, व्हिडिओ कॉलवर बोलत असताना मृत्यू, केरळमधील महिलेचा इस्त्रायलमध्ये मृत्यू https://t.co/cNRwvoLqyj
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
तुमची कामगिरी एकदम बेकार सुरू आहे. भूसंपादनाची नुकसानभरपाई ५५ कोटींवरून १३० कोटींवर गेलीच कशी, याची चौकशी करा. मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर यांची एक समिती करून अहवाल पाठवा. आम्ही निधी उपलब्ध करून देऊ, असेही अजित पवार म्हणाले.
भारतात लवकरच लहान मुलांना कोरोना लस https://t.co/xQTCxVS2pR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
समांतर जलवाहिनीच्या भूसंपादनाची नुकसानभरपाई ५५ कोटी निश्चित केली होती. मात्र माढ्यातील राजकीय नेत्यांनी कृषी अधिकाऱ्यांमार्फत मूल्यांकन वाढवून घेतले. आता ही रक्कम १३० कोटी रुपयांवर गेली आहे. मूल्यांकन कसे वाढले याची चौकशी करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लवकरच अहवाल सादर करण्याचे आदेशही दिल्याचे सांगण्यात आले.
विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू https://t.co/HIfPNTFKuL
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021