पुणे : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. अण्णा बनसोडे हे सुखरूप आहेत. अँथोनी नावाच्या ठेकेदाराच्या मॅनेजरने हा गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. बनसोडे यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र सुदैवाने एकही गोळी त्यांना लागली नाही आणि ते सध्या सुखरूप आहेत.
एसबीआयमध्ये नोकरीची संधी, करा वेळेत अर्ज दाखल
https://t.co/OStBHWPdCj— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
अँथोनी नावाच्या ठेकेदाराच्या सुपरवायझरने हा गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. प्राथमिक माहितीत गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव तानाजी पवार असं आहे. पिंपरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. हा संपूर्ण प्रकार बनसोडे यांच्या कार्यालयाच्या समोर घडल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. पण गोळीबार का केला? हे अद्याप समजलेलं नाही. मीच पवारला बोलवलं होतं, अशी माहिती पोलिसांना अण्णा बनसोडे यांनी दिली.
सोलापूरच्या पाणीप्रश्नावरुन अजित पवारांनी जिल्हाधिका-यांना सुनावले खडेबोल https://t.co/0x9sgqIqOs
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलीस अधिक तपास करत आहेत. अटकेत असलेले तानाजी पवार हे सीआरपीएफचे निवृत्त जवान आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
भारतीय महिलेच्या घरावर रॉकेट हल्ला, व्हिडिओ कॉलवर बोलत असताना मृत्यू, केरळमधील महिलेचा इस्त्रायलमध्ये मृत्यू https://t.co/cNRwvoLqyj
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
* नेमके काय झाले, आमदारानी सांगितले
हल्ला झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं की; ठेकेदार अँथोनी यांचा सुपरवायझर तानाजी पवारला गेल्या काही दिवसांपासून आम्ही संपर्क करत होतो. दोन मुलांना कामाला लावण्यासंदर्भात मी संपर्क करत होतो. माझ्या पीएने तानाजी पवारला फोन केला होता. मात्र त्याने बोलताना अरेरावी केली. त्यामुळे मी त्याला बोलावून घेतलं होतं. त्याला समजावून सांगितलं. मात्र त्याने बाहेर जाऊन थेट गोळीबार केला. आमच्या काही वादावादी झाली नाही, मात्र पवारने वाद घातला. तानाजी पवारने गोळीबार केल्यानंतर उपस्थित असलेल्या मुलाने त्याला खाली पाडलं.
भारतात लवकरच लहान मुलांना कोरोना लस https://t.co/xQTCxVS2pR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021