देहरादून : उत्तराखंडच्या देवप्रयागमध्ये काल मंगळवारी ( 11 मे) दशरथ डोंगरावर ढगफूटी झाली. त्यामुळे येथून वाहणाऱ्या शांता नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. यामुळे शांती बाजार परिसरात मोठं नुकसान झालं आहे. या ठिकाणीची आयटीआयची 3 मजली इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. तर नदी पात्राजवळची 10 पेक्षा अधिक दुकानं वाहून गेली आहेत. देवप्रयाग नगराहून बस आगाराकडे येणारा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे.
Several shops and houses have been damaged because of a cloudburst at #Uttarakhand's Devprayag, around 120 kilometres from #Dehradun, news agency ANI has reported.
.
.#cloudburst #Uttarakhand #Devprayag #shops #houses #damaged #india #water #floods pic.twitter.com/IEAOPMVPpH— Siraj Noorani (@sirajnoorani) May 11, 2021
कोरोना संकटाशी दोन हात करत असतानाच उत्तराखंडमध्ये आरोग्य सुविधांचा जाणावरा तुटवडा प्रशासनापुढे आव्हानाची परिस्थिती उभा करुन गेला. त्यातच आता आणखी एक संकट इथं धडकलं आहे. हे संकट आहे ढगफुटीचं. उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा मंगळवारी ढगफुटी झाल्याचं निदर्शनास आलं. देवप्रयाग येथे झालेल्या या ढगफुटीसदृश पावसामुळं इमारती जमीनदोस्त झाली.
देवप्रयाग में इस दौरान प्रस्तावित कोविड केयर सेंटर और नए तहसील भवन का भी निरीक्षण किया। मेरे साथ माननीय कैबिनेट मंत्री श्री सुबोध उनियाल जी, माननीय आपदा प्रबंधन मंत्री डॉ. धन सिंह रावत जी, विधायक देवप्रयाग श्री विनोद कण्डारी जी भी मौजूद रहे। pic.twitter.com/yB2uxyhH3Z
— Tirath Singh Rawat (मोदी का परिवार) (@TIRATHSRAWAT) May 12, 2021
पावसामुळं पाण्याचा प्रवाह वाढला आणि या शक्तिशाली प्रवाहामुळं काही इमारती, घरं, दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. उत्तराखंडमधील नगरपालिकेचं बहुउद्देशीय भवन आणि आयटीआयची इमारत या ढगफुटीमुळं जमीनदोस्त झाली. उत्तराखंडमधील टेहरी गढवाल जिल्ह्यात असणाऱ्या देवप्रयाग मार्केट परिसरात यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
Uttarakhand: CM Tirath Singh Rawat visits Tehri district's Devprayag area to assess the situation after an incident of cloudburst occurred here yesterday. pic.twitter.com/Xatwi5vDCh
— ANI (@ANI) May 12, 2021
मुख्यमंत्री तिर्थ सिंह रावत यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सदर घटनेनंतर त्यांनी तातडीने माहिती मागवली असून, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढाकार घेतला. देवप्रयाग पोलिस स्थानकातील अधिकारी महिपाल सिंह रावत यांनी दिलल्या माहितीनुसार या भागातील बरीच दुकानं बंद होती. कोरोना काळातील संचारबंदीमुळं इथं नागरिकांची वर्दळही कमीच होती. तरीही, आपत्तीचं गांभीर्य पाहता इथं शोधमोहिमही राबवण्यात आली होती.
Scary visuals coming in from Badkot, Devprayag in Uttarkashi in #Uttarakhand. Reports of cloudburst and flash floods. https://t.co/cDefCnLLNC
— Nidhi Jamwal (@JamwalNidhi) May 11, 2021
जिल्हा व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देवप्रयागमधील उंचावर असणाऱ्या भागामध्ये सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही ढगफुटीची घटना घडली. ज्यामुळं गडेरा या नदीप्रवाहात पाण्याची पातळी अचानकच वाढली. या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळं वाटेत आलेल्या इमातींचं नुकसान झालं आणि हा मातीचा लोट अलखनंदा नदीत मिसळला गेला.