मुंबई : भाईंदरच्या उत्तन समुद्रात मासेमारी करणाऱ्या सहारा बोटीच्या जाळ्यात मोठा देवमासा अडकला होता. तब्बल 12 ते 20 फुट लांब हा देवमासा होता. देवमाश्याचे वजन जवळपास 1500 किलो असल्याचे सांगितले जात आहे. या माशाला मच्छिमारांनी देवमाशाला जीवनदान दिले. यात बोटीचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मत्सविभागाकडून त्यांना मिळणार आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उद्या अक्षय तृतीया, पहा शुभ मुहूर्त #AkshayaTritiya #शुभ #मुहूर्त #surajyadigital #अक्षयतृतीया #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/Ek19qSrsqX
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
तब्बल 12 ते 20 फुट लांब देवमासा हा मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला होता. पण, मच्छिमारांनी या देवमाशाला जीवदान दिले. भाईंदर येथील उत्तन समुद्रात बुधवारी मासेमारी करण्यासाठी मच्छिमार गेले होते. बोटीने टाकलेल्या जाळ्यात अचानक एक भलामोठा मासा लागल्याचा अंदाज आला. मच्छिमारांनी मोठ्या उत्सुकतेनं जाळेवर ओढले असता देवमासा असल्याचे लक्षात आले.
दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर पहिला डोस पुन्हा घ्यायचा का ?, दुसरा डोस वेगळ्या लशीचा घेता येतो का?
https://t.co/3zhp3J77LM— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देवमाशामुळे बोटमालक डेव्हिड गऱ्या यांच्या बोटीचे आणि जाळ्याचे नुकसान झाले आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला होता. त्या आधारे मत्सविभागाकडून त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.
* देवमाशाला जीवनदान
एवढा मोठा मासा जाळ्यात आल्याने बोटीवरील मच्छिमारांची एकच तारांबळ उडाली. देवमाश्याचे वजन जवळपास 1500 किलो असल्याचे सांगितले जात आहे. जाळ्यात अडकलेल्या महाकाय देवमाशाला जीवनदान देण्याचे मच्छिमारांनी ठरवले. त्यानंतर सुरू झाले रेस्यू ऑपरेशन.
कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीतील 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण https://t.co/1atlf0qxcI
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
जाळ्यात अडकल्यामुळे देवमासा भयभीत झाला होता. त्यामुळे तो जाळ्यातून निघण्याचा प्रयत्न करता होता. तर दुसरीकडे सर्व मच्छिमार हे देवमाशाला सोडण्यासाठी जाळे हातात धरून होते. त्याला सोडवण्यासाठी मच्छिमारांनी 2 तास प्रयत्न केले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर मच्छिमारांनी जाळे कापून त्याची सुटका केली. जाळ्यातून सुटका होताच देवमाश्याने लागलीच समुद्रात झेप मारली आणि बघता बघता काही क्षणात देवमासा नाहीसा झाला.