मुंबई : लसींच्या तुटवड्यामुळे अनेकांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. त्यात पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस लवकर नाही घेतला तर पहिला डोस पुन्हा घ्यावा लागतो का; अशा चर्चा आहेत. परंतू देशातल्या आरोग्य तज्ज्ञांनी लशींच्या दोन डोसमध्ये 4 ते 6 आठवड्यांचं अंतर असणं अपेक्षित असतं. मात्र ते 8 ते 10 आठवड्यांपर्यंत लांबलं, तरी काहीही फरक पडत नाही. एवढ्या अंतराने दुसरा डोस घेतला, तरी तो प्रभावीच ठरतो, असं सांगितले आहे.
कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीतील 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण https://t.co/1atlf0qxcI
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
लशीचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना लशीच्या तुटवड्यामुळे दुसरा डोस वेळेत मिळाला नाही तर काय करायचे? याचा आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो का? दुसरा डोस मिळाला नाही तर कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी तयार होणार नाहीत का? दुसरा डोस वेळेत मिळाला नाही तर याची सूचना कुठे द्यायची? आणि पहिला डोस एका लशीचा घेतला, आणि ती लस उपलब्ध नसेल, पण दुसरी उपलब्ध असेल, तर दुसरा डोस वेगळ्या लशीचा घ्यायचा का? या प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांकडून जाणून घेणे गरजेचे आहे.
जीवघेण्या काळात नौटंकी नको, कृतिशील सहभाग नोंदवा, खासदार स्वामींचे त्याच पुनम गेटवर जाहीर सत्कार करेनhttps://t.co/rSNzJhtOp7
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
पहिली लस घेतल्यानंतर साधारण सहा ते आठ आठवड्यांनी दुसरी लस (लशीचा दुसरा डोस) घ्यायची आहे. पण हा कालावधी उलटून गेला आणि तरी लस मिळाली नाही असे झाल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही, असं राज्याच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं, “दुसरी लस वेळेत मिळाली नाही तरी त्याचा प्रकृतीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी त्याची काळजी करू नये. पण दुसरी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भाजप खासदार, आमदारांचे सोलापुरात लाक्षणिक उपोषण https://t.co/6IerCqBKVW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
पण अशी परिस्थिती महाराष्ट्रात नसल्याचा दावा महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे. पहिली लस मिळाली आणि दुसरी लस मिळत नाही असं होत नाहीय असंही ते म्हणाले. लशीचा दुसरा डोस मिळाला नाही तरी आरोग्यावर याचा परिणाम होणार नाही. पण महाराष्ट्रात दुसरा डोस मिळत नाहीय असं झालेलं नाही.”
पहिला डोस एका लशीचा घेतला, आणि ती लस उपलब्ध नसेल, पण दुसरी उपलब्ध असेल, तर दुसरा डोस वेगळ्या लशीचा घ्यायचा का, तर असं करता येणार नाही आणि तशी तरतूदही नाही, असं आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी स्पष्ट केलं.
अजित पवारांची मोठी घोषणा, सहा कोटींचा आदेश रद्द https://t.co/Lb5K92eQJo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे सांगतात, “लशीचे दोन डोस वेगवेगळ्या कंपनीचे देता येणार नाहीत. पहिला डोस एका लशीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या कंपनीच्या लशीचा अशी पद्धत नाही. त्यामुळे नागरिकांनी असे करू नये.” लसीकरण करणाऱ्या केंद्रांवरही अशी सोय उपलब्ध नसल्याचं राज्य कृती समितीचे सदस्य डॉ.शशांक जोशी यांनी स्पष्ट केलं.
उद्या शुक्रवारी साजरी होणार रमजान ईद, चंद्रदर्शन घडलं नसल्यानं धर्मगुरूंचा निर्णय https://t.co/XutgmTqOtA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021