सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशा जीवघेण्या काळात नौटंकी करू नका. कृतिशील सहभाग नोंदवा. कृतिशील सहभाग नोंदवून लोकांच्या मदतीला धावून आलात. तर त्याच पूनम गेटवर तुमचा जाहीर सत्कार करेन. असा उपरोधिक टोला पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाजप आमदार, खासदारांना लगावला आहे.
रिक्षा चालकांना अनुदानासाठी फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही https://t.co/88qEHh3yrV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
सोलापूर जिल्ह्याला सापत्न वागणूक देऊन रुग्णांच्या संख्येनुसार इंजेक्शन, ऑक्सिजन, लशींचा पुरवठा होत नाही, याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे खासदार व आमदारांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार राजेंद्र राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, आमदार राम सातपुते आदींनी उपोषणात सहभाग घेतला. दुपारी सर्व आमदार व खासदारांनी पायी चालत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
भाजप खासदार, आमदारांचे सोलापुरात लाक्षणिक उपोषण https://t.co/6IerCqBKVW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, एका पक्षात असूनही दोन देशमुखांचे सुत कधीच जुळले नाही. असे दोघे सोलापूरकरांसाठी रस्त्यावर उतरले. याचा आनंदच आहे. खरे पाहता या दोघांकडेही मंत्रीपदे होती. आरोग्य आणि सहकार ही दोन महत्त्वपूर्ण खाती त्यांनी सांभाळलली. परंतु सहकार तत्वावरील एक हॉस्पिटल त्यांच्या कार्यकाळात उभी राहिली. असे काही घडले नाही. कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीत महाविकास आघाडी सरकारने आरोग्य यंत्रणा कुठेच तोकडी पडू दिलेली नाही. आज बिहार आणि उत्तर प्रदेशात मृतदेह नदीत फेकले जात आहेत.
अजित पवारांची मोठी घोषणा, सहा कोटींचा आदेश रद्द https://t.co/Lb5K92eQJo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
परंतु महाराष्ट्रात अशी भयंकर परिस्थिती नाही. पण केंद्राच्या इशाऱ्यावर नाचावे लागणाऱ्या नेत्यांना भाजपचे सरकार जिथे नाही, तिथे नौटंकी करावीच लागत आहे. आणि हे कलावंत ठरलेलेच आहेत. सोलापूरच्या स्थानिक पातळीवर हेच नाट्य सुरू झाले आहे. यात काही नवल नाही. परंतु अशा नौटंकीपेक्षा कोरोनाच्या या लढ्यात सक्रिय सहभाग घेऊन राजकारणाचे जोडे बाहेर ठेवले. तर ते सोलापूरकरांच्या अधिक हिताचे ठरेल. असे मला वाटते.
उद्या शुक्रवारी साजरी होणार रमजान ईद, चंद्रदर्शन घडलं नसल्यानं धर्मगुरूंचा निर्णय https://t.co/XutgmTqOtA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
सुदैवाने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी देखील भगव्या कपड्यात या आंदोलनात अवतरले आहेत. हीच आंदोलनात्मक भूमिका, आक्रमकता, दिल्ली दरबारी दाखवून लस राज्यासाठी मोठ्यासंख्येने मागून घेतली. तर या खासदार महास्वामींचे सोलापूरकरांवर खूप उपकार होतील. निदान अशावेळी तरी राजकारण बाजूला ठेवा. आपण सारे मिळून कोरोनाला हरविण्याच्या युद्धात एकत्र येऊया. हेच माझे सर्वांना आवाहन आहे.
वेळापुरात पोलीस कर्मचारी वकीलास लाचलुचपत खात्याने ठोकल्या बेड्या https://t.co/lHe0ZbmIlY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
* खासदार स्वामींचे त्याच पुनम गेटवर जाहीर सत्कार करेन
आरोग्य यंत्रणा असो किंवा रेमडीसीवीर इंजेक्शन आणि लस असो. लस पुण्याला घेऊन जात असल्याचा आरोप सोलापूरची राजकीय मंडळी करीत आहेत. परंतु त्यांना वस्तुस्थितीची जाणीव असूनही नाटकं करून दिशाभूल केली जात आहे. हा केवळ सोलापूर किंवा पुण्याचा प्रश्न नाही. तर तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. परंतु राज्यात भाजपाची डाळ शिजली नाही.
म्हणून त्यांच्या वाट्याला झुकते माप मिळत नाही. पक्षीय राजकारण खेळले जात आहे. हे केवळ महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल. या पळवून नेण्याच्या आरोपापेक्षा खासदारांनी सोलापूरचा कोटा वाढीव करून घेतला. त्याच्यावर त्यांनी सोलापूरकरांचा हक्क सांगितला तर त्याच खासदार स्वामींचे त्याच पुनम गेटवर जाहीर सत्कार करेन आणि ते पळवून नेण्याचे धाडस करणाऱ्यांचे हात कलम करण्याची हिंमत देखील मी दाखवून देईन. असेही पालकमंत्री भरणे म्हणाले.