वेळापूर : वेळापूर (ता. माळशिरस) पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी व अकलूज येथील वकीलावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. वेळापूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. यात वकिल आणि पोलिसाला बेड्या ठोकल्या आहेत.
भाजप खासदार, आमदारांचे सोलापुरात लाक्षणिक उपोषण https://t.co/6IerCqBKVW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
रिक्षा चालकांना अनुदानासाठी फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही https://t.co/88qEHh3yrV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. भागवत पांडुरंग झोळ (वय ५२ वर्ष, पोलीस हवालदार ब. नं. ३५४ वेळापूर पोलीस ठाणे, ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर ग्रामीण ) आणि चंद्रकांत महादेव रिसवडकर (वय ४० वर्ष, वकील, सुजय नगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तक्रारदार व त्यांचे वडील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यांमध्ये अटक करून जामिनास मदत करण्याकरिता पाच हजार रुपयांची मागणी करून ५ हजार रुपये महादेव मंदिर ट्रस्टचे गाळ्यासमोर स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.
अजित पवारांची मोठी घोषणा, सहा कोटींचा आदेश रद्द https://t.co/Lb5K92eQJo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
या प्रकरणी मार्गदर्शक – राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक, ला. प्र. विभाग पुणे चार्ज औरंगाबाद, मारुती पंडित, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. विभाग औरंगाबाद , प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. विभाग, उस्मानाबाद यांच्यामार्फत सापळा अधिकारी- गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक ,ला.प्र.वि. उस्मानाबाद, सापळा पथक पो. अंमलदार. अर्जुन मार्कड, विष्णू बेळे, विशाल डोके, सिद्धेश्वर तावस्कर, चालक करडे ला. प्र. वि. उस्मानाबाद यांनी कारवाई केली.