मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यासाठी स्वत:हून लेखी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. थेट बँक खात्यात अनुदान देण्यासंदर्भातील पोर्टलचे काम सुरू आहे. त्यानंतर सर्व संघटना व रिक्षाचालकांना कळवणार असल्याचं परिवहन उपायुक्तांनी सांगितलं.
भाजप खासदार, आमदारांचे सोलापुरात लाक्षणिक उपोषण https://t.co/6IerCqBKVW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संखेत भर पडताना पाहायला मिळत आहे. अशात राज्यात शासना कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याचाच विचार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे अनुदान मिळण्यास रिक्षाचालकांना अडचणी येत आहेत.
सलमानचा राधे चित्रपट आज होणार प्रदर्शित #Radhe #surajyadigital #सुराज्यडिजिटल #salmankhan #films pic.twitter.com/uimSe0tnil
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना 1500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला आहे. तथापि, काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षा चालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत आहेत, अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहेत.
उद्या शुक्रवारी साजरी होणार रमजान ईद, चंद्रदर्शन घडलं नसल्यानं धर्मगुरूंचा निर्णय https://t.co/XutgmTqOtA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरू आहे. ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना व रिक्षाचालकांना याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केले जाईल. यासाठी मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेणे किंवा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे परिवहन उपायुक्त यांनी कळविले आहे.
गुगल पेची ग्राहकांसाठी खुशखबर ! अमेरिकेतून भारतात पैसे पाठवा https://t.co/SymVWBASZy
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021