नवी दिल्ली : देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी कोरोना विषाणूसंदर्भात एक विचित्र वक्तव्य केलं आहे. कोरोना व्हायरस हा सुद्धा एक जीव आहे. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, असं रावत म्हणाले. तसेच आपण मानव त्याच्यापेक्षा स्वत:ला बुद्धिमान समजतोय आणि त्याला नष्ट करायला निघालो आहोत. त्यामुळेच कोरोना व्हायरस वारंवार स्वत:ला बदलत आहे, असंही ते म्हणाले.
कोरोना कॉलर ट्यूनवरून उच्च न्यायालय भडकलं; म्हणे….हा संदेश 10 वर्षे चालवाल https://t.co/tY29DckEst
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
त्रिवेंद्र सिंह यांनी केलेल्या व्यक्तव्यावरुन राजकीय टीकाही सुरु झालीय. त्रिवेंद्र सिंह यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कोरोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, असं मत व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर त्रिवेंद्र सिंह यांचं हे वक्तव्य तुफान व्हायरल झालं आहे. हे विधान व्हायरल होत असून त्यावर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
सारे हळहळले! 'ती' आयुष्याची लढाई हरली, 'लव यू जिंदगी' या गाण्यासोबत झाली होती लोकप्रिय
https://t.co/24NbJ4YZQF— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दार्शनिक दृष्टीकोणातून पाहिलं तर कोरोना व्हायरस सुद्धा जिवंत जीव आहे. इतर लोकांप्रमाणेच त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. परंतु आपण मानव त्याच्यापेक्षा स्वत:ला बुद्धिमान समजतोय आणि त्याला नष्ट करायला निघालो आहोत. त्यामुळेच कोरोना व्हायरस वारंवार स्वत:ला बदलत आहे, असं त्रिवेंद्रसिंह रावत म्हणाले. मानवाला जर सुरक्षित राहायचे असेल तर त्याने व्हायरसच्या पुढे निघून गेलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियातून प्रचंड टीका होत असून रावत यांना ट्रोल केलं जात आहे.
सोलापुरात उद्यापासून अत्यावश्यक सेवा सुरु – पालकमंत्री https://t.co/Hr4SFJG8Ni
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
या व्हायरस जीवाला सेंट्रल व्हिस्टामध्ये आसरा द्यायला हवा, असं टोला एका यूजर्सने लगावला आहे. कोरोनना एक प्राणी आहे. मग त्याला आधार कार्ड आणि रेशन कार्डही असायला हवं, असा चिमटा राष्ट्रीय युथ काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी काढला आहे.
श्वेता तिवारीला मारहाण, महिला आयोगाने घेतली दखल https://t.co/k9ReX6Rhqm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021