नवी दिल्ली : अखेर भारतात तिसरी कोरोना लसही दाखल झाली आहे. आज स्पुटनिक व्ही लसीचा पहिला डोस कस्टम फार्मा सर्व्हिसेसचे जागतिक प्रमुख दीपक सप्रा यांना देण्यात आला आहे. हैदराबादच्या डॉ. रेड्डी लेबॉर्टरीजमध्ये ही लस देण्यात आली आहे. दरम्यान रशियाने विकसित केलेली ही लस पुढल्या आठवड्यापासून मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता भारतात कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड यांच्यानंतर स्पुटनिक व्ही ही लसही लोकांना मिळणार आहे.
कोरोना सुद्धा एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार – माजी मुख्यमंत्री https://t.co/EPTODdvKx2
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
रशियामध्ये निर्मिती करण्यात आलेली स्पुटनिक व्ही लस लवकरच भारतीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती गुरुवारी सरकारच्या वतीने देण्यात आली. स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप भारतात आली आहे. दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे.
कोव्हिशिल्ड डोसमधील अंतर वाढवले, पुनावालांनी केले स्वागत https://t.co/NL6a08oYZA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
* लसीच्या किंमतीची घोषणा
कालच्या या घोषणेनंतर आज डॉक्टर रेड्डीज लॅबोरेट्रीच्या माध्यमातून आज या लसीचा पहिला डोस हैदराबादमध्ये दिला आहे. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेट्रीने रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंडशी करार केला असून त्याअंतर्गत हा डोस देण्यात आला आहे. यावेळी कंपनीने लसीच्या किंमतीची घोषणा केली असून लसीचा एक डोस ९४८ रुपयांना उपलब्ध असणार आहे. त्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याने एकूण किंमत ९९५ रुपये ४० पैसे इतकी असेल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही रशियन बनावटीची लस भारतात सरासरी हजार रुपयांना उपलब्ध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर पहिला डोस पुन्हा घ्यायचा का ?, दुसरा डोस वेगळ्या लशीचा घेता येतो का?
https://t.co/3zhp3J77LM— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीतील 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण https://t.co/1atlf0qxcI
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 13, 2021
* भारतातील सहा कंपन्यांसोबत चर्चा
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रशियामधून पहिला साठा हा १ मे रोजी भरतात दाखल झाला. स्थानिक औषध प्रशासनाने त्याला १३ मे रोजी मान्यता दिली. पुढील काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात या लसीचा साठा पाठवला जाईल. त्यादरम्यान दुसरीकडे भारतीय कंपन्यांच्या माध्यमातूनही या लसींची निर्मिती केली जाणार आहे. कंपनी सध्या भारतातील सहा कंपन्यांसोबत ही लस बनवण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे सांगण्यात आलं आहे. अनेक संशोधनांमध्ये ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे.
अक्कलकोटमधील कोविड सेंटरवर जावून खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पाहणी केली. कन्नड भाषेत संवाद साधला #akkalkot #solapur #kannada #MP #संवाद #surajyadigital #कन्नड #सुराज्यडिजिटल #kowid #center #अक्कलकोट https://t.co/ZWMOGXEPdh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021