सोलापूर : सोलापूर शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार भरत किसन मेकाले याला सोलापूर शहर पोलिसांनी एमपीडीए कायद्यानुसार १३ मे रोजी स्थानबद्ध केले असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.
सोलापुरात उद्यापासून अत्यावश्यक सेवा सुरु – पालकमंत्री https://t.co/Hr4SFJG8Ni
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
भरत मेकाले हा सावकारी व्यवसाय करीत होता आणि लोकांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून १५ ते २० टक्क्यांपर्यंत व्याज घेत असल्याची तक्रार विविध पोलिस ठाण्यात दाखल होती. घातक शस्त्रानिशी हल्ला करणे, खंडणी मागणे, दुखापत करणे, जबरी चोऱ्या करणे, टोळी जमवून गैरकृत्य करणे अशा विविध गंभीर गुन्ह्यांसाठी ओळखला जात होता. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मेकाले याने सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली असल्याचे लक्षात आल्यामुळे त्याच्याविरुद्ध २०१९ व २०२० मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मेकाले याच्याविरुद्ध जमीन बळकावणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले.
अक्कलकोटमधील कोविड सेंटरवर जावून खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पाहणी केली. कन्नड भाषेत संवाद साधला #akkalkot #solapur #kannada #MP #संवाद #surajyadigital #कन्नड #सुराज्यडिजिटल #kowid #center #अक्कलकोट https://t.co/ZWMOGXEPdh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
गुंड भरत मेकाले याच्याविरुद्ध वेळो-वेळी कार्यवाही करूनही वर्तनात सुधारणा न झाल्याने एमपीडीए अधिनियम १९८१ अन्वये स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर अखेर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
टाइम्स ग्रुपच्या चेअरपर्सन, पद्म भूषण इंदू जैन यांचं निधन https://t.co/1uuqzXe2F9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021