कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक सतेज पाटील आणि हस मुश्रीफ गटाने एकहाती जिंकली. त्यानंतर आता गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. विश्वास पाटील हे अनुभवी संचालक आहेत. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यात चुरस होती. अखेर विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सत्तारूढमधील सर्व संचालक पिवळे फेटे बांधून सभागृहात उपस्थित होते. निवडीनंतर दोन्हीही मंत्र्याचा जयघोष केला.
कोव्हिशिल्ड डोसमधील अंतर वाढवले, पुनावालांनी केले स्वागत https://t.co/NL6a08oYZA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
गोकुळ दूध संघावर विरोधकांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर पहिल्याच चेअरमनची निवड शुक्रवारी होत आहे. या पदासाठी डोंगळे व पाटील दोघे इच्छुक आहेत. हे दोघेही सत्ताधारी आघाडीतून विरोधी आघाडीत आले आहेत. या दोघांपैकी कोणाला संधी द्यायची याबाबत बैठक झाली. नेत्यांच्या या बैठकीत निर्णय झाला नाही. काल तब्बल अडीच तास बैठक घेऊन संचालकांची मते जाणून घेतली होती. मात्र निर्णय झाला नव्हता. त्यामुळे आज सकाळी पुन्हा सर्व संचालकांशी मोबाइलद्वारे चर्चा करून विश्वास पाटील यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर चिठ्ठीव्दारे हे नाव बंद लिफाफ्यात गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात पाठवण्यात आले. त्यामुळे आज शुक्रवारी सकाळी पुन्हा बैठक झाली. त्यामध्ये नाव निश्चित करण्यात आले.
विठू-रखुमाईला हापूस आंब्यांची आरास, दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्यांची आरास https://t.co/2QlL3U0lns
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक गटाच्या तब्बल तीन दशाकाच्या सत्तेला सतेज पाटील गटाने सुरुंग लावला. 4 मे रोजी झालेल्या मतमोजणीवेळी गोकुळच्या एकूण 21 जागांपैकी तब्बल 17 जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले. तर सत्ताधारी महाडिक गटाला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले.
शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा, लगेच चेक करा, 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 19 हजार कोटी वर्गhttps://t.co/kVPp7MzCOc
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
अत्यंत चुरशीची वाटणारी पण सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने एकहाती जिंकलेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीनंतर, आता अध्यक्षपदाची निवड झाली आहे. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. विश्वास पाटील हे अनुभवी संचालक आहेत. महत्त्वाचं म्हणजे गोकुळ निवडणुकीच्या अगोदर त्यांनी महाडिक गटातून सतेज पाटील यांच्या गटात प्रवेश केला होता.
आज ईद, अक्षय तृतीया, परशुराम आणि बसवेश्वर जयंती, पंतप्रधान मोदी यांनी दिल्या शुभेच्छा…#pm #surajyadigital #Eid #सुराज्यडिजिटल #शुभेच्छा #parshuramjayanti2021 #basavjayanti #Jayanti pic.twitter.com/j1cOM7FDCc
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
गोकुळमधील महाडिकांची तीन दशतकांची सत्ता उलथवण्यात, सत्तातंर करण्यात विश्वास पाटील यांचा मोठा हात होता. त्यामुळेच मोठा वाटा उचलल्याचं बक्षीस म्हणून विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यात चुरस होती. अखेर विश्वास पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.
आज अक्षय तृतीया : या गोष्टी दान केल्या जातात, जाणून घ्या अधिक माहिती https://t.co/PQVhZDq1AB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव एमआयडी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील यांच्या निवडीवर शिक्कमोर्तब झाले.
”गोकुळ दुध उत्पादकांना प्रतिलीटर दोन रूपये दरवाढ देण्याची घोषणा केली होती. ती लवकरच पूर्ण केली जाईल. गोकुळ दुध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. गोकुळला नवे वैभव प्राप्त करून दिले जाईल.”
विश्वास पाटील – अध्यक्ष , गोकुळ दूध संघ