मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन आपल्या आगामी ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. कारण, अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी 50 कोटी रुपये मानधन घेतल्याचे वृत्त आहे. मात्र, याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना यांचा ‘पुष्पा’ हा चित्रपट 2 पार्ट्समध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साहेब मुत्तमसेती यांनी केली आहे. तसेच, सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
सलमान खानवर एवढी वाईट वेळ आली… https://t.co/qwjqgBrcc9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या चाहत्यांची यादी तशी खूप लांब आहे. प्रत्येक फॅन आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात. अल्लूचा चित्रपट प्रदर्शित होताच सुपर हिट ठरतोच. अशा परिस्थितीत अभिनेता अल्लू अर्जुन आपल्या आगामी ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्याचे आगामी चित्रपटासाठीचे मानधन हा विषय सध्या खूप चर्चेत आला आहे. हा चित्रपट यावर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.
'श्रीमंताघरची सून' अनन्या खऱ्या आयुष्यात आहे फिजियोथेरपिस्ट डॉक्टर https://t.co/68PrNBi7fd
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
अलीकडेच दक्षिणात्य सुपर स्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली होती. ही माहिती त्याने स्वतः शेअर केली होती. त्यानंतर फिल्मस्टारने स्वत:ला क्वारंटाईन केले आणि तो बराच काळ घरात अलिप्त राहिला. त्यानंतर त्याला लवकरात लवकर बरे वाटावे म्हणून चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. आता हा लाडका अभिनेता कोरोना मुक्त झाला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो कोरोना मुक्त झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या मुलांना भेटताना दिसला.
Meeting family after testing negative and 15 days of quarantine. Missed the kids soo much 🖤 pic.twitter.com/ubrBGI2mER
— Allu Arjun (@alluarjun) May 12, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुष्पा या चित्रपटाच्या एका महत्त्वाच्या भागाचेही शूटिंग करण्यात आले आहे. अलीकडेच या चित्रपटाविषयी एक मोठी गोष्ट समोर आली आहे, ज्याचे कनेक्शन थेट अल्लू अर्जुनशी आहे. दक्षिणात्या मनोरंजन विश्वाचा स्टार अल्लू अर्जुन या बहुप्रतीक्षित चित्रपटासाठी तगडे मानधन घेत असल्याचे वृत्त समोर आले आहे. झूमच्या वृत्तानुसार, अभिनेत्याने या चित्रपटासाठी तब्बल 50 कोटी मानधन आकारले आहे.
टाइम्स ग्रुपच्या चेअरपर्सन, पद्म भूषण इंदू जैन यांचं निधन https://t.co/1uuqzXe2F9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, अल्लू अर्जुन ‘पुष्पा’साठी 50 कोटी रुपये इतका मोठा मोबदला घेतला आहे. या चित्रपटाची निर्मिती अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांचे मेहुणे साहेब मुत्तमसेती यांनी केली आहे. तसेच, सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासून चाहते याबद्दल उत्सुक झाले आहेत. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनच्या मानधनाचे वृत्त समोर आले असल्याने चाहते आणखीनच उत्साही झाले आहेत. पुष्पामध्ये शनल पुरस्कार विजेता अभिनेता फहाद फासिल मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.
बारावीच्या परीक्षा रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका https://t.co/vxl8lnBdwm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021