सोलापूर : काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते, आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक, मोची समाजाचे युवा नेते करण म्हेत्रे (वय – ४०) यांचे आज शनिवारी (ता. १५) दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे यांचे पती होत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांचे ते कट्टर समर्थक होते.
बापरे ! गंगा नदीतून २ हजारांच्यावर मृतदेह काढले बाहेर, मोठी आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता https://t.co/QRF9dU5XLo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
करण म्हेत्रे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. नंतर विनीत या हॉस्पिटलमध्ये पुढे शिफ्ट करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना आज शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समजली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मृत्यूची माहिती मिळताच शेकडो कार्यकर्ते त्या हॉस्पिटलच्या परिसरात जमा झाले. आपला नेता गेल्याने कार्यकर्त्यांनी आक्रोश केला. माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे यांचे पती होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते. मोची समाजात त्यांच वजन होते. आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पुढाकार दिसून येत होता.
सराईत गुन्हेगार भरत मेकालेवर एमपीडीची कारवाई, येरवडा कारागृहात रवानगी https://t.co/seoPvo33mN
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
गरीब कुटुंबातून मोठ्या मेहनतीने करण यांनी समाजात वेगळे स्थान मिळवले होते. ताडीच्या विरोधात ते आक्रमक होते. मोची समाजातील युवकांसाठी त्यांनी स्वखर्चाने जिम बांधली होती. समाजातील धडपडीचा युवा नेता कोरोनाचा बळी ठरल्याने मोची समाजातून दुःख व्यक्त होत आहे.
सलमान खानवर एवढी वाईट वेळ आली… https://t.co/qwjqgBrcc9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021