नवी दिल्ली : गंगा नदीतून आतापर्यंत २ हजारांच्यावर मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय मंत्र्यांनी दिली. हे मृतदेह उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील काही जिल्ह्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यांना गंगा नदींच १४०० किमी अंतरापर्यंत लांब खोरं लाभलेलं आहे.
पुढील तीन तासांत आणखी तीव्र होणार चक्रीवादळ, सिंधुदुर्गातील 38 गावांना अलर्ट https://t.co/XvghapAuoX
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील बहुतांश मृतदेह हे गंगा काठच्या दुर्गम गावातील कोरोना रुग्णांचे आहेत. नदीपात्राच्या जवळील अनेक गावातील लोक गरीब आहेत. त्यांच्याकडे आपल्या कुटुंबियांवर अंत्यसंस्कार करण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे ते मृतदेह नदीत फेकून देत आहेत.
More than 2 thousand dead bodies in 1140 km along the Ganga river #PositivityUnlimited pic.twitter.com/F8Dh3U0xUY
— Ravi Bhartiya 🇮🇳 (@ravibhartiya_) May 15, 2021
आता या दोन्ही राज्यांनी नदी पात्रात स्वच्छ ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाय योजना सुरु केल्या आहेत. केंद्रीय गृहखात्याने दोन्ही राज्यांना हे प्रकरण थांबले नाही तर नदीचे पाणी दूषित होईल आणि मोठी आरोग्य समस्या निर्माण होईल, असा इशारा दिला. केंद्रीय संस्थांनी ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याची चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील ग्रामीण भाग मोठ्याप्रमाणावर आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचे कोरोनाने निधन https://t.co/Y8hBlPmgjr
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* दोन्ही राज्यांना केंद्राच्या सूचना
केंद्रीय मंत्री उत्तर प्रदेश आणि बिहार सरकारच्या संपर्कात आहेत. त्यांनी गंगेतून वाहून आलेल्या मृतदेहांची त्वरित चाचणी करण्याच्या सुचना केल्या आहेत. या दोन राज्यात या मृतदेहांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी करण्यात येत आहेत. मृतदेह नदीपात्रात फेकण्याच्या घटना या जास्तीकरून कानपूर, गाझीपूर, उन्नाव आणि बालिया या जिल्ह्यात घडल्या आहेत. हे मृतदेह पुढे वाहत बिहारपर्यंत पोहचले. या दोन्ही राज्यांना याबाबत त्वरित पावले उचलण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.
@narendramodi good evening Modi ji, im want to share something, in ganga River bacteriophage virus present, i think this virus kill corona virus too because many bacteria till present time bacteriophage can kill that's why Ganga River water till now Bacteria free. We can do sir?
— Rajat (@Rajat61231596) May 15, 2021
* गस्त वाढवण्यास सांगितले
गंगा नदीत फेकलेल्या मृतदेहांचा शोध घेतला असता हे मृतदेह धार्मिक अंत्यविधी करुन नदीत फेकल्याचे निदर्शनास आले आहे. आता स्थानिक पोलिसांना नदी काठच्या गावात गस्त वाढवण्यास सांगण्यात आले आहे. याचबरोबर त्यांना गावाकऱ्यांमध्ये मृतदेह नदीत न फेकण्याबाबत प्रबोधन करण्याचेही आदेश त्यांना देण्यात आले आहेत. यापूर्वी, बिहारने हे मृतदेह उत्तर प्रदेशातील जिल्ह्यातून बिहारच्या हद्दीत वाहत येत असल्याचा आरोप केला होता.
बारावीच्या परीक्षा रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका https://t.co/vxl8lnBdwm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021