जळगाव : सांडपाणी व वेस्टेज केमिकल्स साठविण्याची टाकी स्वच्छ करीत असताना त्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. एमआयडीसीतील समृद्धी केमिकल्स या कंपनीत ही घटना घडली. गोटू झगडू कोळी, मयुर विजय सोनार, दिलीप अर्जुन कोळी अशी मृतांची नावे आहेत.
उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, पाच जणांचा मृत्यू, ११ जणांची झाली सुटका, ५ लाखांची मदत जाहीर https://t.co/htvwNvQ7Op
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
टाकीत साफसफाई करत असताना दिलीप सोनार यांचा पाय घसरला. गाळात ते खाली जात असताना इतर दोघांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते देखील चिखलात ओढले गेले. रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (३२,रा. चिंचोली, ता.यावल), मयुर विजय सोनार (३५, रा. कांचन नगर) व दिलीप अर्जुन कोळी (५४, रा. कांचन नगर, मुळ रा. खिरोदा, ता.रावेर) अशी मृतांची नावे आहेत.
काँग्रेसचे कार्यकर्ते, मोजी समाजाचे नेते करण म्हेत्रे यांचे निधन https://t.co/JMZ7k4ssNe
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
अजिंठा चौफुलीला लागूनच असलेल्या आयोध्यानगर रस्त्यावरील जुन्या एमआयडीसीतील ए सेक्टरमध्ये प्लाॅट क्र. ८४,८५ मध्ये सुबोध सुधाकर चौधरी व सुयोग सुधाकर चौधरी यांच्या मालकीची समृद्धी केमिकल्स नावाची रासायनिक खत निर्मिती करण्याची कंपनी आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बापरे ! गंगा नदीतून २ हजारांच्यावर मृतदेह काढले बाहेर, मोठी आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता https://t.co/QRF9dU5XLo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
अपर्णा सुयोग चौधरी यांच्या नावावर ही कंपनी आहे. यात २० ते २५ मजूर रोज कामाला आहेत. शनिवारी कंपनीला सुट्टी असल्याने मालक सुबोध चौधरी यांनी मयूर विजय सोनार व दिलीप सोनार यांना कंपनीचे वेस्टेज केमिकल्स व सांडपाणी साठवण्याची टाकी साफसफाई करण्यास सांगितले होते.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचे कोरोनाने निधन https://t.co/Y8hBlPmgjr
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
या टाकीत केमिकल मिश्रित चिखल व गाळ होता. टाकीत साफसफाई करीत असताना दिलीप सोनार यांचा वरुन पाय घसरला व ते या सांडपाण्यात बुडाले. हा प्रकार लक्षात येताच रवींद्र कोळी यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. टाकीतून हात धरून ओढत असताना कोळी हेच खाली खेचले गेले व त्यामुळे ते देखील टाकीत बुडाले. हे पाहून मयूर याने धाव घेतली व दोघांना वाचवण्यात तोही टाकीत बुडाला. अवघ्या दहा मिनिटात तिघे या टाकीत बुडाले. इतर कामगारांनी तातडीने धाव घेऊन तिघांना बाहेर काढले. मालवाहू टेम्पो मधून जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी त्यांना मृत घोषित केले.
सलमान खानवर एवढी वाईट वेळ आली… https://t.co/qwjqgBrcc9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021