नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाने अप्पर डिव्हिजन लिपिकसह अनेक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या तरूणांना या भरतीमुळे दिलासा मिळणार आहे. तेव्हा तारीख आणि सूचनेवर लक्ष द्या. तयारीला लागा.
भयंकर चक्रीवादळ ! मुसळधार पाऊस सुरू, आज घरातच राहा; केरळ, तामिळनाडू, गुजरातसह महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा #तौक्ते #चक्रीवादळ #इशारा #पाऊस #surajyadigital #भयंकर #Denger #maharashtra #Gujarat #गुजरात #महाराष्ट्र pic.twitter.com/kjkZTIDOvf
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार भारतीय तटरक्षक दलात एकूण 75 पदांसाठी भरती केली जाईल. डिवीजन क्लर्क व नागरी कर्मचारी अधिकारी या पदावर जाहीर झालेल्या या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत, अर्ज प्रक्रिया 60 दिवस सुरू राहील. या पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 28 जून 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जळगावमध्ये केमिकल्सच्या टाकीत बुडून तिघांचा मृत्यू, एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात गेला तिघांचा बळी https://t.co/QD4uq9V1Xd
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत ते अधिकृत संकेतस्थळवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या अधिसूचनांचे संपूर्णपणे वाचन केल्यानंतरच या रिक्त पदासाठी अर्ज करा. अर्जाची तारीख संपल्यानंतर, अधिकृत संकेतस्थळावरून अॅप्लिकेशनची लिंक काढून टाकण्यात येईल. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीतील प्रेझेंटेशनच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेशी संबंधित संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, पाच जणांचा मृत्यू, ११ जणांची झाली सुटका, ५ लाखांची मदत जाहीर https://t.co/htvwNvQ7Op
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
भारतीय तटरक्षक दलाने जारी केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही सरकारी विभागात उमेदवार पदस्थ असणे बंधनकारक आहे. पदांनुसार, पात्रतेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत सूचना तपासा. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या वयोमर्यादेविषयी पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण अधिकृत सूचना पाहू शकता. बर्याच पदांसाठी वयाची कमाल मर्यादा 56 वर्षांपेक्षा जास्त नसावी. या भरतीबाबत खास बाब म्हणजे त्यात अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतीही फी भरण्याची गरज नाही.
अल्लू अर्जुनने 'या' चित्रपटासाठी घेतले 50 कोटींचे मानधन, 'पुष्पा' दिसणार अल्लू अर्जुन आणि रश्मिका https://t.co/c6KgALRpHV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
* या पदांची होणार भरती
– वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी – 02
– नागरी कर्मचारी अधिकारी – 12
– नागरी राजपत्रित अधिकारी – 08
– विभाग अधिकारी – 07
– अप्पर डिव्हिजन लिपीक – 46