अक्कलकोट : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अक्कलकोट येथील 25 ऑक्सिजन बेडची सुविधा ही अपुरी पडत आहे. त्यामुळे त्याला 100 ऑक्सिजन बेडच्या सुविधेत रूपांतरित केले जाणार आहे.100 ऑक्सिजन बेडची सुविधा उद्या बुधवार पासून (ता.19मे) कार्यान्वित करण्यात येणार आहे. यात 90 ऑक्सिजन बेड व 10 बायपॅप बेड असणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारत बायोटेकचा प्रकल्प नागपुरातून पुण्यात वळवला, भाजपचा आरोप, पवारांनी आरोप फेटाळला https://t.co/cVlCqwrOLw
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
दरम्यान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या आमदार निधीतून 25 लाख तर आपत्कालीन निधीतून 25 लाख ,असे एकूण 50 लाख रुपये खर्चून या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यावस्थ रुग्णास ऑक्सिजन मिळण्यास मदत होणार आहे.100 ऑक्सिजनयुक्त सुविधा असणारे जिल्ह्यातील हे पहिले कोविड सेन्टर असणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर ग्रामीणमध्ये शुक्रवारपासून दहा दिवस कडक लॉकडाऊन, सर्व बंद https://t.co/oZGXUbB6cJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
या पत्रकार परिषदेस प्रांत अधिकारी सुप्रिया डांगे, तहसिलदार अंजली मरोड, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महादेव कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोड आदीजण उपस्थित होते.
कोरोनाने मरणार्यांची संख्या देखील कमी नाही, म्हणून कोरोनाचे लक्षण आढळत असतील तर तात्काळ तपासणी करुन घ्या आणि मोफत उपचार करुन घ्या, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
महापौरांनी केला पालिका आयुक्तांचा निषेध https://t.co/oFsLOisiUc
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
अक्कलकोट तालुक्यात आजपर्यंत 2 हजार 887 कोरोना रुग्ण आढळले असून त्यापैकी 2 हजार 190 रुग्ण बरे होवून घरी गेले तर अद्याप डेडिकेटेड केअर सेंटर व कोवीड केअर सेंटरमध्ये 366 रुग्णांनी उपचार घेत आहेत. नागरिकांना ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, श्वसनाचे त्रास, अंग दुखी, डोके दुखी, पोटात मळमळणे, उलट्या होणे आदी लक्षणे दिसत असतील तर त्यांनी अंगावर न काढता, तात्काळ न घाबरता अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे तपासणी करुन घ्यावे, असे आवाहन केले आहे.