पुणे : सिकंदराबाद येथील सैन्य भरती प्रक्रियेच्या प्रमुख अधिकाऱ्यानेच पेपर फोडल्याचे समोर आले. भगतप्रितसिंग बेदी असे या लेफ्टनंट कर्नलचे नाव असून तोच या रॅकेटचा मुख्य सुत्रधार असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्याला सिकंदराबाद येथून पुणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला आज पुणे कोर्टासमोर उपस्थित करण्यात आले कोर्टाने त्याला २५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
भारत बायोटेकचा प्रकल्प नागपुरातून पुण्यात वळवला, भाजपचा आरोप, पवारांनी आरोप फेटाळला https://t.co/cVlCqwrOLw
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
भारतीय सैन्य दलातील वेगवेगळ्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविणार्या सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख अधिकार्यानेच सैन्य भरती पेपर फोडला. या मुख्य सुत्रधार अधिकार्यास सिकंदराबाद व त्याच्या साथीदारास दिल्ली येथून पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
दोन जहाजांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 146 जणांना वाचवले https://t.co/zTRfm9Jm1c
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
भगतप्रितसिंग बेदी (रा. सिकंदराबाद) असे भरती प्रक्रिया प्रमुख लेफ्टनंट कर्नलचे नाव आहे. त्याचा साथीदार नारनेपाटी वीरप्रसाद (रा. दिल्ली) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. सैन्य दलातील कर्मचार्यांच्या नातेवाईकांसाठी आर्मी शिपाई पदासाठी भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षा २८ फेब्रुवारी रोजी भारतभरातील ४० केंद्रांवर होणार होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या परिक्षेच्या प्रश्न पत्रिका फोडून काही व्यक्ती ती प्रश्नपत्रिका व्हॉटसअपवरुन वेगवेगळ्या खासगी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना भरघोस रक्कमेला विकणार असल्याची गोपनीय माहिती सर्दन कंमाड मिलिटरी इंटेलिजन्सच्या लायझन युनिटला मिळाली होती. ही गोपनीय माहिती त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना कळविली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या पथकाने वानवडी आणि विश्रांतवाडी परिसरात सापळा रचला.
महापौरांनी केला पालिका आयुक्तांचा निषेध https://t.co/oFsLOisiUc
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
यात सापळा कारवाई करून किशोर गिरी (रा. माळेगाव), माधव गित्ते (रा. सॅपर्स विहार कॉलनी, विश्रांतवाडी), गोपाळ कोळी (रा. बीईजी सेंटर, दिघी), उदय औटी (रा. बीईजी सेंटर, खडकी) यांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांना हा पेपर तामिळनाडु येथील आर्मी अधिकारी थिरु मुरगन याने दिल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक केली. हा पेपर त्याला दिल्लीतील अधिकारी वसंत किलारी याच्याकडून आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली.
फॅनने गायिकेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा केला प्रयत्न, पहा व्हिडिओ, गायिकेने दिले कडक उत्तरhttps://t.co/lbHSC0JKsg
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
त्यानंतर सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख अधिकारी भगतप्रितसिंग बेदी यानेच पेपर लिक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भालेराव, हवालदार अतुल साठे व राजपूत यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन बेदी याला दिल्लीहून ताब्यात घेऊन अटक केली.
खूश रहिए….#सुराज्यडिजिटल #Behappy #lunchbox #surajyadigital #खुशरहिए #smallchild
– गरजूंना डब्बा दिला जातोय, छोटा मुलगा त्यावर 'खुश रहिए' म्हणून संदेश लिहित आहे. यावर आपणास काय वाटते ? pic.twitter.com/OYdoE22RMO— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021