सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत आता पालिका आयुक्तांनी महापौर असा नव्या वादाला तोंड फुटले आहे. महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा तिसऱ्यांदा निषेध केला आहे.
सोलापूर ग्रामीणमध्ये शुक्रवारपासून दहा दिवस कडक लॉकडाऊन, सर्व बंद https://t.co/oZGXUbB6cJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
पालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील वाद काही नवा नाही. सत्तेचा कारभार असताना पदाधिकारी प्रशासनामध्ये असे वाद नेहमीच होत असतात, मात्र महापौर आणि पालिका आयुक्त यांच्या यांच्यामध्ये आता वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. महापौर आणि पालिका आयुक्तमध्ये बऱ्याच दिवसापासून धुसफूस चालू आहे. पालिका आयुक्त पदाधिकाऱ्यांना तसेच नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाची चाचणी न करताच मोबाईलवर अहवाल प्राप्त https://t.co/0yHxaxTnZT
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
मनमानी कारभार करतात. बैठकांना निमंत्रण दिले असता येत नाहीत,पदाधिकार्यांचे ऐकत नाहीत अशा तक्रारी महापौरांच्या आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुद्धा महापौरांनी तक्रार केली होती. त्यावेळी आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणा मी मान्यता देतो, असे ठामपणे सांगितले होते.
* नेमके काय घडले
पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा निषेध नोंदवला, त्याला निमित्त ठरले ते आकृतिबंधाच्या बैठकीचे. पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांसमवेत आकृतिबंध संदर्भात बैठक घेतली. त्यानंतर महापौरांकडे आकृतिबंधाच्या बैठकीचे नियोजन केले होते. महापौरांनी तीन वेळा बैठक बोलावली, मात्र प्रत्येक बैठकीकडे आयुक्त फिरकले नाहीत. पालिका आयुक्तमुळे तीन वेळा बैठक महापौरांना तहकूब करावी लागली.
सोमवारच्या बैठकीला महापौरांनी तब्बल पाऊणतास प्रतीक्षा केली. निमंत्रण देऊन, बोलावून देखील अतिरिक्त आयुक्त , उपायुक्त तसेच पालिका आयुक्त बैठकीकडे आले नाहीत. त्यामुळे वैतागून महापौरांनी पालिका आयुक्तांचा निषेध करीत सभात्याग केला. महापौर सभात्याग करून बाहेर जातात तेव्हाच पालिका आयुक्त महापौर कार्यालयात आले.
दोन जहाजांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 146 जणांना वाचवले https://t.co/zTRfm9Jm1c
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021