मुंबई : तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या मच्छिमारांसाठी नौदलाचे जवान धावून आले. रात्रभर सुरु असलेल्या ऑपरेशन दरम्यान 273 पैकी 146 जणांचे प्राण वाचवण्यात भारतीय नौदलाला यश आलंय. ज्यामध्ये 111 आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकातानं 17 जणांना, तर ओएसव्ही ग्रीटशिप अहिल्या आणि ओएसव्ही ओशन एनर्जीद्वारे 18 जणांना वाचवले.
तौकताई चक्रीवादळाने काल सोमवारी (17 मे) दिवसभर मुंबईत अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ज्याचा फटका संपूर्ण मुंबईसह आजूबाजूच्या परिसराला बसला आहे. समुद्रात बऱ्याच खोलवर असलेल्या या चक्रीवादळाने मुंबईला जोरदार तडाखा दिला आहे.
खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांचे वक्तव्य, गोमुत्र प्यायल्यामुळे मला कोरोना झाला नाही #MP #भाजपा #खासदार #statment #वक्तव्य #साध्वी #कोरोना #CoronaPositive pic.twitter.com/dLBgfMbEO9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
त्यातच आता एक अशी माहिती समोर आली आहे की, मुंबईनजीकच्या ‘बॉम्बे हाय’ येथील दोन बोटींवर तब्बल 410 जण अडकले होते. ज्यापैकी 146 जणांची सुटका करण्यात आली असून अद्यापही अनेक जण बोटींवर अडकले असल्याचं समजतं आहे. काल रात्रभर हे बचाव कार्य सुरुच होतं.
भारत बायोटेकचा प्रकल्प नागपुरातून पुण्यात वळवला, भाजपचा आरोप, पवारांनी आरोप फेटाळला https://t.co/cVlCqwrOLw
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला मोठा फटका बसल्याचं पहायला मिळत आहे. चक्रीवादळ थेट मुंबईला धडकलं नसलं तरी त्याचा परिणाम हा मुंबईवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तर कुठे सखल भागात पाणी साचल्याचं पहायला मिळालं. त्यातच आता हाजी आली परिसरात 11 लहान बोट बुडाल्याचे वृत्त आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर ग्रामीणमध्ये शुक्रवारपासून दहा दिवस कडक लॉकडाऊन, सर्व बंद https://t.co/oZGXUbB6cJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
मुंबईच्या समुद्रात अडकलेल्या या 410 जणांना वाचविण्यासाठी भारतीय नौदलाने आपल्या तीन भल्या मोठ्या जहाजांना घटनास्थळी पाठवलं होतं. यावेळी इतरांना वाचविण्यासाठी नौदलाच्या जवानांनी अक्षरश: आपल्या प्राणांची बाजी लावली. मुंबईपासून जवळजवळ 175 किलोमीटर दूर बॉम्बे हाय फिल्ड येथील हीरा ऑईल फिल्ड्स जवळ येथील एका बोटीवर कमीत कमी 273 जण अडकल्याची माहिती सर्वात आधी नौदलाला मिळाली होती. याबाबतची माहिती नौदलाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मुंबई – 2 मोठी जहाजं भरकटली; 410 जण अडकले, गुजरातला बसणार फटका
https://t.co/HyoYoHxkda— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
याबाबतची माहिती मिळताच भारतीय नौदलाने तात्काळ त्यांच्या सुटकेसाठी आयएनएस कोच्ची आणि आयएनएस तलवार या दोन जहाजांना बचावा कार्यासाठी धाडलं. याशिवाय 137 लोकांसह अडकलेल्या जीएएल कंस्ट्रक्टरने देखील एसओएस अलर्ट पाठवला होता. जे मुंबईच्या समुद्रपासून 15 किलोमीटर दूर होते.
दरम्यान, हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरची देखील मदत घेतली जात आहे. तौकताई चक्रीवादळ हे आता गुजरातमध्ये धडकलेलं असलं तरीही अद्याप समुद्र खवळलेलाच आहे. त्यामुळे बचाव कार्यात काही अडचणी येत आहे.
'तौत्के': महाराष्ट्रात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, नऊजण जखमी, पुढचे काही तास धोक्याचे, तौत्के चक्रीवादळ रात्री गुजरातमध्ये धडकणारhttps://t.co/sU98GOcSFe
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021