सोलापूर : उजनी जलाशयाच्या बिगरसिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनीतून उचलून शेटफळगढे या नव्या प्रकल्पात टाकण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वी घेतला होता. इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला होता. तो निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केली. तो आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी रद्द केल्याच पत्र आमदार संजय शिंदे आणि त्यांच्या शिष्टमंडळाला दिले.
महापौरांनी केला पालिका आयुक्तांचा निषेध https://t.co/oFsLOisiUc
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाणी प्रश्नावरून ढवळल्यानंतर उशिरा का होईना, जलसपंदा मंत्र्यांनी हा निर्णय मागे घेतला. या निर्णयाविरोधात आमदार प्रणिती शिंदे, संजय शिंदे, बबनराव शिंदे, शहाजीबापू पाटील, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील यांनी आवाज उठविला होता. शहर – जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या एकजुटीला यश प्राप्त झाले आहे.
अक्कलकोटमध्ये उद्यापासून 100 ऑक्सिजन बेडचे कोविड सेन्टर सुरू https://t.co/zhIgl2Rzjs
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्यासाठी देण्याचा निर्णय झाला. परंतु, उजनी धरणाच्या पूर्वी ठरलेल्या पाणी वाटपातील एक थेंबही पाणी इंदापूरसाठी नेण्यात येणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी व अन्य बाबींसाठी ठरलेल्या पाण्यातील एक थेंब जरी पाणी इंदापूरला नेले असल्यास मी राजकारण सोडून देईन, असे वारंवार पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ठणकावून सांगितले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भरती प्रक्रिया प्रमुख अधिकाऱ्यानेच फोडला सैन्य भरतीचा पेपर, आतापर्यंत नऊजणांना अटक https://t.co/BesxZHCuJA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
मात्र, सांडपाणी धरणात आल्यानंतर धरणात कितीही पाणीसाठा असल्यास त्यातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी देण्याचा तो निर्णय होता. त्याला सोलापूर जिल्ह्यातून मोठा विरोध झाला. त्यासंदर्भात दोन-तीन वेळा बैठकाही झाल्या. त्या वेळी सर्वांनी हा आदेश रद्द करण्याचीच मागणी लावून धरली. त्यासाठी आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, उमेश पाटील, उत्तम जानकर, निरंजन भूमकर आदींनी जलसंपदा मंत्र्यांची मंगळवारी भेट घेऊन निर्णय रद्दची मागणी केली होती.
उजनी पाणीविषयी माहिती देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील #ujjain #surajyadigital #सुराज्यडिजिटल #jayantpatil #जयंतपाटील #solapur #सोलापूर pic.twitter.com/mffiTeCS66
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
राज्याच्या जलसंपदा विभागाने 22 एप्रिल रोजी उजनीत येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांना देण्यासंदर्भात निर्णय घेतला. त्यासंदर्भात बरेच गैरसमज झाल्याची कबुली जलसंपदा मंत्र्यांनी दिली. तो आदेश रद्द करून सुधारित आदेश काढले जातील, असेही त्यांनी मंगळवारी सांगितले. त्यामुळे नव्या आदेशाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं स्वतःच्या वाढदिवशी दुबईत केलं लग्न https://t.co/Yn2ynJPxxA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021