सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक सतीश निंबाजी मुळे यांना बडतर्फ करण्यात आले. प्रशासकीय अध्यक्ष श्रीनिवास पांढरे यांनी ही कारवाई केली. मुळे यांच्यावर कर्तव्यात कसूर, स्वतःच्या फायद्यासाठी, आर्थिक लाभासाठी त्रयस्थ व्यक्तींशी संगनमत करून संघाचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
'आरोग्यमंत्र्यांनी महिनाभरात लसीचा दुसरा डोस घेतलाच कसा?' https://t.co/cUKExaokO6
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
कार्यकारी संचालक या नात्याने मुळे यांनी कोणतीही वस्तुस्थिती पाहिली नाही. उलट कर्तव्यात कसूर व स्वतःच्या आर्थिक लाभापोटी संघाचे नुकसान केल्याचे सिद्ध झाले असून याप्रकरणी त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे सांगितले.
उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील, काँग्रेसच्या टूलकिटवर हल्लाबोल
https://t.co/Z91rFHk9HY— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दूध अॅडव्हान्स, गायी खरेदी, अॅडव्हान्स पशुखाद्य, अॅडव्हान्स वाहतूक यांच्याकडे थकीत रक्कमा असताना त्यांनी कायदेशीर कारवाई केलीच नसल्याचे समोर आले आहे. याबरोबर एक लाख रुपयांवरील ज्या थकीत रक्कमा आहेत, त्यावरही काहीच कारवाई केली नाही. जिल्ह्यातील 11 संस्थांकडे 89 लाख 70 हजार 189 रूपये येणे बाकी असून त्यांच्यावर काहीच कारवाई केली नसल्याचा ठपका ठेवला आहे.
तौत्के चक्रीवादळ; पाच राज्यांत 23 जणांचा मृत्यू #surajyadigital #toukte #तौक्ते #वादळ #सुराज्यडिजिटल #23death pic.twitter.com/llKQH9JQnG
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021